आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Pakistan Plane Crash News And Update | Karachi Airport News Update | Pakistan International Airlines (PIA) Passenger Plane Accident Today News Video And Updates From Karachi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तान:कराचीतील रहिवासी परिसरात विमान क्रॅश; 37 मृतदेह बाहेर काढण्यात आले, 3 प्रवासी जिवंत असल्याची पुष्टी

कराचीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कराची विमानतळापासून काही अंतरावरील जिन्ना गार्डन परिसरातील मॉडल कॉलोनीमध्ये क्रॅश झाला
  • क्रैश होताच विमानात आग लागली आणि मॉडल कॉलोनीमधील अनेक घर या आगीच्या विळख्यात आले

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे एक पॅसेंजर विमान एअरबस ए-320 शुक्रवारी कराचीजवळ क्रॅश झाले. हे विमान लाहौरवरुन कराचीला येत होते. काही तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाल्याची माहिती आहे. विमानात 91 प्रवासी आणि 7 क्रू मेंबर होते. यात 51 पुरुष, 31 महिला आणि 9 मुले होती. आतापर्यंत 37 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. तसेच, तीन जण जिवंत असल्याची पुष्टी झाली आहे.

घटनेवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, या घटनेमुळे खुप मोठा धक्का बसला आहे. मी पीआयएचे सीईओ अर्शद मलीकच्या संपर्कात आहे. घटनेची चौकशी केली जाईल. सध्या बचाव कार्य, हीच आमची प्राथमिकता आहे. 

घरांवर कोसळले विमान

या विमान अपघाताचे काही फोटोज समोर आले आहे. विमान कराची विमानतळापासून काही अंतरावर असलेल्या जिन्ना गार्डन परिसरातील मॉडल कॉलोनीमध्ये क्रॅश झाले. या परिसराला मलीर म्हटले जाते. विमान घरांवर कोसळल्याने अनेक घरांमध्ये आग लागली. काही घरांमधून धूर निघत असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घरांमध्ये अनेकजण अडकले आहेत. 

क्रॅशनंतर कराचीच्या मॉडल कॉलोनीमधील घरांना लागलेली आग.
क्रॅशनंतर कराचीच्या मॉडल कॉलोनीमधील घरांना लागलेली आग.

10 वर्षे जुने होते विमान- पीआईए

पीआईएच्या प्रवक्त्याने जियो न्यूजला सांगितल्याप्रमाणे- विमान 10 वर्षे जुने होते. विमानाच्या लँडींग गिअरमध्ये तांत्रिक अडचण होती. विमानात पायलट सज्जाद गुलसह एक को पायलट, तीन एअर होस्टेसदेखील होत्या. या अपघातात कोणत्याही व्यक्तीची जिवंत राहण्याची आशा फार कमी आहे.

पाकिस्तानी आर्मीची क्विक रिएक्शन टीम आणि रेंजर्स घटनास्थळी दाखल.
पाकिस्तानी आर्मीची क्विक रिएक्शन टीम आणि रेंजर्स घटनास्थळी दाखल.
बातम्या आणखी आहेत...