आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे एक वक्तव्य व्हायरल होत आहे. देशासाठी कर्ज मागताना मानसिक तणाव आणि संकोचांना सामोरे जावे लागले असून UAE च्या अध्यक्षांकडे कर्ज मागताना मला लाज वाटली असल्याचे त्यांनी सांगितले.
शाहबाज आठवडाभरापूर्वी परदेश दौऱ्यावर गेले होते. त्यांनी जिनिव्हा येथील हवामान शिखर परिषदेत भाग घेतला होता. यानंतर ते सौदी अरेबिया आणि नंतर यूएईला गेले. त्यांनी तिन्ही ठिकाणी कर्ज मागितले होते. सौदीने 2 आणि UAE ने $ 1 बिलियन हमी ठेव देण्याचे आश्वासन दिले. हे पैसे फक्त ठेव म्हणून राहतील. पाकिस्तान सरकार हे खर्च करू शकणार नाही.
शाहबाज यांनी सांगितले की, मी दोन दिवसांपुर्वी UAE वरुन आलो आहे. तिथे मोहम्मद बिन झायेद हे माझ्याशी खूप प्रेमाने वागले. त्यांच्याकडून जास्त कर्ज मागणार नाही, असे ठरवले होते. पण, शेवटच्या क्षणी ठरवले आणि त्याच्याकडून आणखी कर्ज मागायचे धाडस केले. त्यांना म्हणालो की, सर तुम्ही माझे मोठे भाऊ आहात. मला खूप लाज वाटते, पण काय करू. मी खूप लाचार आहे. तुम्हाला आमच्या अर्थव्यवस्थेबद्दल माहिती आहे. तुम्ही मला आणखी एक अब्ज डॉलर्स द्या, अशी विनंती मोहम्मद बिन झायेद यांना केल्याचे शाहबाज शरीफ यांनी सांगितले.
गेल्या आठवड्यात शरीफ यांनी पाकिस्तानी लष्कराच्या पासिंग आऊट परेड समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. तेव्हाही त्यांनी देशाच्या अवस्थेवर भाष्य केले. लष्कर आणि आयएसआय प्रमुखांसह राष्ट्रपती आरिफ अल्वीही येथे उपस्थित होते. लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर आणि आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल नदीम अंजुम यांच्यासमोर शाहबाज शरीफ यांचे हे विधान महत्त्वाचे मानले जात होते. कारण पाकिस्तानच्या एकूण बजेटचा सर्वात मोठा हिस्सा लष्करावर खर्च होतो आणि दरवर्षी त्यात 10% वाढ होते.
शरीफ परेडमध्ये म्हणाले होते की, प्रत्येक वेळी कर्ज मागावे लागते ही माझ्यासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. पाकिस्तान अणुशक्ती असल्यामुळे ते अधिक वाईट वाटते. देश म्हणून आपण कधीपर्यंत कर्जावर अवलंबून राहणार आहोत. देश चालवण्याचा हा योग्य मार्ग नाही आणि अशा प्रकारे आपण देशाला योग्य दिशेने नेऊ शकत नाही. आज नाही तर उद्या हे कर्ज परत करायचे आहे, याचाही विचार केला पाहिजे.
पूरग्रस्त देशाला काही मदत मिळावी म्हणून जिनेव्हामध्ये शाहबाजने पाकिस्तानसाठी 16 अब्ज डॉलर्सची मदत मागितली. मात्र, येथून त्याला 10 अब्ज डॉलर्स देण्याचे आश्वासन देण्यात आले. यातील एक पैसाही पाकिस्तानच्या सरकारी तिजोरीत पोहोचलेला नाही.
मदत मागितली आणि कर्ज मिळाले
पाकिस्तानातील सर्वात मोठे वृत्तपत्र 'द डॉन' ने संपादकीय आणि एका विशेष अहवालात खुलासा केला आहे की, जिनिव्हामध्ये पाकिस्तानला दिलेले 10 अब्ज डॉलर्स हे देणगी किंवा धर्मादाय नसून कर्ज आहे. एवढेच नाही तर हे कर्जही तीन वर्षांत हप्त्यांच्या स्वरूपात दिले जाणार आहे.
या खुलाशानंतर पंतप्रधान शाहबाज शरीफ, अर्थमंत्री इशाक दार आणि अनेक कॅबिनेट मंत्री मीडियासमोर हजर झाले. येथे दार म्हणाले की, 10 पैकी 8.7 अब्ज डॉलर्स हे प्रत्यक्षात कर्ज आहे. आम्ही जिनिव्हा येथे बिनशर्त मदतीचे आवाहन केले होते.
आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे दार पुढे म्हणाले की, हे कर्ज कोणत्या अटींवर मिळेल हे मी सांगू शकत नाही. त्याचवेळी शरीफ म्हणाले की, कर्जाच्या अटी फारशा कडक नसतील अशी अपेक्षा आहे. हे पैसे कधी मिळणार याबाबत काहीही सांगणे घाईचे होईल.
सौदीने कसा दिला धक्का?
2020 मध्ये सौदीने पाकिस्तानला आणखी 3 अब्ज डॉलरचे तेल कर्जावर दिले. तेव्हा त्यांनी एक अट घातली होती आणि ही पाकिस्तासाठी लाजिरवाणी बाब होती. सौदीने म्हटले होते की, ते 36 तासांच्या नोटीसवर हे पैसे काढू शकतात, पाकिस्तानलाही व्याज द्यावे लागेल आणि ते फक्त हमी पैसे असतील. म्हणजे पाकिस्तानला खर्च करता येणार नाही. यावेळीही परिस्थिती बदललेली नाही. त्यामुळे जुन्याच अटी कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
2019 मध्ये सौदीचे क्राउन प्रिन्स सलमान यांनी पाकिस्तानला भेट दिली. त्यानंतर इम्रान खान पंतप्रधान होते आणि त्यांनीच गाडी चालवली होती. त्यानंतरही सलमानने पाकिस्तानमध्ये 10 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले होते. 3 वर्षे झाली तरी आश्वासनाची पूर्तता झाली नाही. पुन्हा एकदा क्राउन प्रिन्सने 10 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीचा पुनरुच्चार केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.