आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापीओके म्हणजेच पाकव्याप्त काश्मीरमध्ये इम्रान खान यांच्या पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारने महिलांसाठी एक हुकूम जारी केला आहे. सरकारने तेथे राहणाऱ्या सर्व महिला विद्यार्थिनी आणि शिक्षकांना हिजाब घालणे अनिवार्य केले आहे. पाकिस्तानच्या समा टीव्हीच्या वृत्तानुसार, पीओके सरकारने याबाबत अधिसूचना जारी केली.
महिला विद्यार्थिनी आणि शिक्षकांनी शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब न घातल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे लिहिले आहे. अधिसूचना जारी होताच तेथील लोकांनी विरोध करण्यास सुरुवात केली.
तालिबानी फरमान
पीओके सरकारच्या या निर्णयाची तुलना अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीशी केली जात आहे. स्थानिक पत्रकार मुर्तझा सोलंगी यांनी पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांची खिल्ली उडवली. त्यांनी म्हटेल की, हा टूथलेस डेंटिस्ट पाकिस्तानच्या फॅसिस्ट पक्षासाठी काम करतो. त्याचे सरकार पीओकेमध्ये तालिबानी नियम कसे काय लागू करु शकते, असा सवाल त्यांनी केला.
गेल्या वर्षी अफगाणिस्तानातही तालिबानने कॉलेजमध्ये शिकण्यासाठी येणाऱ्या मुलींना संपूर्ण शरीर झाकून ठेवावे लागेल, असा आदेश दिला होता. कॉलेजमध्ये त्याचे डोळेही दिसू नयेत. मात्र, या आदेशानंतर काही महिन्यांनी तालिबानने महिलांच्या विद्यापीठातील शिक्षणावर बंदी घातली.
पीओकेमध्ये आर्थिक संकटामुळे परिस्थिती बिकट
पाकिस्तानच्या सियासत या वृत्तपत्राने काही दिवसांपूर्वी एका अहवालात दावा केला होता की, पीओकेमधील लोकही पाकिस्तानच्या आर्थिक दुर्दशेचा फटका सहन करत आहेत. अन्नाअभावी तेथील अनेक कुटुंबे उपासमारीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहेत. बांधकामे ठप्प झाल्याने हजारो लोक बेरोजगार झाले आहेत.
हिजाब, तलाकनंतर लग्नाच्या वयावरून गोंधळ का?
'मुस्लिम पर्सनल लॉ' मधील आणखी एका नियमाविरोधात देशाच्या सर्वोच्च न्यायालयात चर्चेची तारीख मंजूर करण्यात आली आहे. यावेळी मुद्दा मुस्लिम मुलींच्या लग्नाच्या वयाचा आहे. 17 ऑक्टोबर 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी सुनावणीसाठी 9 नोव्हेंबर 2022 ही तारीख निश्चित केली आहे. दिव्य मराठी एक्सप्लायनरमध्ये आपण या प्रकरणाशी संबंधित सर्व पैलू जाणून घेणार आहोत. येथे वाचा संपुर्ण बातमी.
इराणी अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर उतरवला हिजाब
52 वर्षीय हेंगामेह गजियानीने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये तिने हिजाब घातला नव्हता. या व्हिडिओसोबत तिने लिहिले होते- हा कदाचित माझा शेवटचा व्हिडिओ आहे. मला एवढेच सांगायचे आहे की, या क्षणानंतर माझ्यासोबत काहीही झाले तरी मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत इराणच्या लोकांच्या पाठीशी आहे. येथे वाचा संपुर्ण बातमी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.