आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात आज वैऱ्याची रात्र:विरोधी पक्षांच्या नेत्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची तयारी, केव्हाही अटक होण्याची शक्यता, रक्तपात होण्याची भीती

इस्लामाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकच्या इम्रान खान सरकारविरोधात रविवारी संसदेत सादर होणाऱ्या अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री अनेक धक्कादायक घटना घडण्याची शक्यता आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी शुक्रवारी देशाला 'संडे सरप्राइज' देण्याचे संकेत दिले होते. त्यांच्या या कथित सरप्राइजची काही माहिती आता हळूहळू बाहेर येत आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, शनिवारी रात्री उशिरा विरोधी पक्षांच्या अनेक महत्वाच्या नेत्यांना अटक होण्याची शक्यता आहे. सरकारने त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची सर्व तयारी पूर्ण केली आहे.

तथापि, पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार रविवारी पाकिस्तानात 3 मोठ्या घटना घडू शकतात. 1) अविश्वास ठरावावर चर्चा. 2) सभापतींनी ठरवले तर मतदान. 3) इस्लामाबादेत इम्रान यांची रॅली.

आजची रात्र महत्वाची

पाक लष्कर व इम्रान खान या दोघांचे विश्वासू मानले जाणारे ज्येष्ठ पत्रकार अंसार अब्बासी यांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान आखान सरकार कोणत्याही वेळी विरोधी पक्षांच्या नेत्यांना अटक करु शकते. अटकेपूर्वी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. यासाठी गुप्त बैठकांचे सत्र सुरू आहे. या नेत्यांवर देशाविरोधातील परकीय कटात सहभागी असल्याचे एक विशेष कलमही दाखल केले जाणार आहे. याचे अधिकार सरकारकडे आहेत.

लष्कराने इम्रान यांना राजीनामा देण्याची सूचना केली होती. पण, इम्रान यांनी ती फेटाळून लावली.
लष्कराने इम्रान यांना राजीनामा देण्याची सूचना केली होती. पण, इम्रान यांनी ती फेटाळून लावली.

लष्कर साथ देणार काय?

अब्बासी यांच्या मते, लष्कराने विरोधक व इम्रान या दोघांपुढेही 3 अटी ठेवल्यात. एक-इम्रान यांनी राजीनामा द्यावा. दोन-संयुक्त आघाडी सरकार स्थापन करावे. तीन-संसद भंग करुन तत्काळ निवडणूक घ्यावी.

माहितीनुसार, इम्रान यांचा पहिल्या अटीला विरोध आहे. तिसरी अट असिफ अली झरदारी यांना मान्य नाही. त्यामुळे पाकिस्तानातील राजकीय संकटावर मध्यम मार्ग काढण्याचा पर्याय संपुष्टात आला आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षांच्या नेत्यांना होणारी संभाव्य अटक व त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मुद्यावर लष्कर कोणती भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या प्रकरणी तोडगा निघाला नाही तर लष्कर पाकमध्ये आणीबाणी लादण्याचीही शक्यता आहे. या सर्व गोष्टी रविवारी सांयकाळपर्यंत स्पष्ट होतील.

रक्तपाताचा धोका

इम्रान खान रविवारी इस्लामाबादेत रॅली करणार आहेत. लष्कर व आयएसआयचा याला विरोध आहे. पण, इम्रान स्वतःचा स्वार्थ साधण्याची कोणतीही संधी सोडण्यास तयार नाहीत. इम्रान यांची रॅली संसदेतील अविश्वास ठरावावरील चर्चा व मतदानापूर्वी होणार की नंतर हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण, तज्ज्ञांनी मतदानात इम्रान यांचा पराभव झाला तर त्यांच्या समर्थकांकडून मोठा हिंसाचार होण्याची भीती व्यक्त केली आहे. याचे संकेत खैबर पख्तुंख्वामध्ये मिळालेत. येथील मुख्यमंत्री महमूद खान यांची यासंबंधीची एक ध्वनिफित नुकतीच व्हायरल झाली होती. खैबरमध्ये पाकिस्तान तहरिक ए इंसाफ म्हणजे इम्रान यांच्या पक्षाचे सरकार आहे. या ऑडियोत महमूद स्पष्टपणे आपल्या पक्षाच्या समर्थकांना हिंसाचारासाठी प्रेरित करताना ऐकावयास येत आहे.

बातम्या आणखी आहेत...