आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इम्रानची पत्नी नवाज यांच्या मुलीवर दाखल करणार गुन्हा:बुशरा पतीसाठी लाच घेत असल्याचा केला होता मरियम नवाज यांनी आरोप

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी बुशरासोबत इम्रान खान. या त्यांची तिसरी पत्नी असून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत. (फाइल फोटो)   - Divya Marathi
पत्नी बुशरासोबत इम्रान खान. या त्यांची तिसरी पत्नी असून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत. (फाइल फोटो)  

आता पाकिस्तानच्या राजकारणात दोन महिलांमध्ये नवी स्पर्धा सुरू आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबी आता पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज (PML-N) च्या उपाध्यक्षा मरियम नवाज यांच्याविरोधात फौजदारी खटला दाखल करणार आहेत.

मरियम या माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची मुलगी आणि विद्यमान पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भाची आहे. मरियम अनेक महिन्यांपासून आरोप करत आहे की इम्रान पंतप्रधान असताना बुशरा बीबी सरकारी कंत्राट मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे उकळत होती आणि त्याचे सर्व पुरावे आहेत. बुशरा या खान यांची तिसरी पत्नी आहे. पाकिस्तानमध्ये त्यांना पिंकी पिरनी या नावाने ओळखले जाते.

इम्रान पंतप्रधान असताना बुशराने बेकायदेशीरपणे करोडो रुपये कमावल्याचा आरोप मरियम नवाज यांनी केला आहे. ट्रान्सफर-पोस्टिंगसाठीही ती मोठी रक्कम घेत असे.
इम्रान पंतप्रधान असताना बुशराने बेकायदेशीरपणे करोडो रुपये कमावल्याचा आरोप मरियम नवाज यांनी केला आहे. ट्रान्सफर-पोस्टिंगसाठीही ती मोठी रक्कम घेत असे.

इम्रानच्या पक्षाची धमकी

  • मरियम अलीकडेच एका रॅलीत म्हणाील्या होत्या की, आपल्या देशातील लोकांना किती पुरावे हवे आहेत? प्रत्येक गुन्ह्याचे पुरावे असतात. ऑडिओ आणि व्हिडिओ देखील आहे. तोशाखाना (सरकारी खजिना) भेटवस्तू बुशराच्या सांगण्यावरूनच दुबईत विकल्या गेल्या हे खरे नाही का? बिल्डरने हिऱ्याची अंगठी बुशरालाच का भेट दिली? बुशरा यांचा माजी पती, बहीण आणि मुलांच्या खात्यात अचानक करोडो रुपये कसे येऊ लागले? बदली आणि पोस्टिंगच्या नावाखाली कोणी करोडोंची संपत्ती कोणी कमावली?
  • मरियम यांच्या या आरोपांवर इम्रान यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) संतापला. त्यांना बचाव करणे कठीण जात आहे. याचे कारण सर्व माध्यम वाहिन्यांकडे या आरोपांचे पुरावे आणि बुशरा यांच्या बँकिंग व्यवहारांचे तपशीलही आहेत.
  • मात्र, इम्रान यांचे जवळचे मित्र आणि त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ सदस्य फवाद चौधरी यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, बुशरा बीबी गृहिणी आहेत. त्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. मरियम यांचे आरोप चुकीचे आहेत. बुशरा आता मरियम यांच्यावर फौजदारी खटला दाखल करणार आहेत. बुशराच्या वतीने मरियम यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.
इम्रान यांनी बुशरा बीबी यांना अनेकवेळा आपली आध्यात्मिक गुरू म्हटले आहे. बुशरा यांच्याशी सल्लामसलत केल्याशिवाय ते कोणताही राजकीय निर्णय घेत नसल्याचे सांगण्यात येते.
इम्रान यांनी बुशरा बीबी यांना अनेकवेळा आपली आध्यात्मिक गुरू म्हटले आहे. बुशरा यांच्याशी सल्लामसलत केल्याशिवाय ते कोणताही राजकीय निर्णय घेत नसल्याचे सांगण्यात येते.