आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रीलंकेप्रमाणेच पाकिस्तानही वाईट टप्प्यातून जात आहे. तिकडेही आर्थिक परिस्थिती सतत बिकट होत चालली आहे. परिस्थिती अशी झाली आहे की, पाकिस्तान सरकार दररोज वेगवेगळे निर्णय घेत आहे. आर्थिक संकटामुळे पाकिस्तानमध्ये वीज संकटाची समस्या निर्माण झाली आहे. दरम्यान, पाकिस्तान सरकारने वीज बचतीचा अनोखा मार्ग अवलंबला आहे. वीज आणि इंधनाची बचत करण्यासाठी सरकारने राजधानी इस्लामाबाद आणि कराचीतील बाजारपेठा रात्री नऊ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जारी केले.
रात्री ९ नंतर शहरात संचारबंदी लागू
पाकिस्तान सरकारने वीज बचतीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मार्गदर्शक सूचनांनुसार, रात्री 9 नंतर शहरात कलम 144 लागू करण्यात येणार आहे. मात्र, मॅरेज हॉल रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहतील. तर रेस्टॉरंट, उद्योग, क्लब, उद्याने आणि सिनेमा हॉल रात्री 11:30 वाजेपर्यंत सुरू राहतील. याशिवाय मेडिकल स्टोअर्स, फार्मसी, हॉस्पिटल, पेट्रोल पंप, सीएनजी पंप, बेकरी, दूध विक्री केंद्रे, भाजी मंडई, तंदूर आणि बस स्टँडच्या वेळेत शिथिलता देण्यात आली आहे.
16 जुलैपर्यंत कायम राहणार आदेश
पाकिस्तानमध्ये, पंजाबचे मुख्यमंत्री हमजा शाहबाज यांनी गेल्या शनिवारी सांगितले की, सरकारला वीज संकटावर मात करण्यासाठी अधिकाधिक ऊर्जा वाचवायची आहे, त्यामुळे हे आदेश देण्यात आले आहेत. कामगार संघटनेच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा आदेश १६ जुलैपर्यंत लागू राहणार आहे.
पाकिस्तानातील लोकांना कमी चहा पिण्याचे आवाहन
चहा आयातीच्या बाबतीत पाकिस्तान जगात पहिल्या क्रमांकावर असेल, पण येथील सरकारनेच जनतेला चहा कमी पिण्याचे आवाहन केले आहे. अलीकडेच पाकिस्तानचे ज्येष्ठ मंत्री अहसान इक्बाल यांनी आपल्या देशातील नागरिकांना चहा कमी पिण्याचा सल्ला दिला होता. अहसान म्हणाले होते, मी समाजालाही आवाहन करेन कि, आपण एक ते दोन कप चहा कमी करावा, कारण आपण जो चहा आयात करतो, तोही उधारीवर आयात करतो. या आवाहनानंतर पाकिस्तानातील आर्थिक स्थितीची खरी परिस्थिती समोर आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.