आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाईव्ह "बेइज्जती":कॉलर लाईव्ह सेशनमध्ये इम्रान खान यांना माकड, फरार व निर्लज्ज म्हणाला, या व्हायरल व्हिडिओचा आनंद घ्या

इस्लामाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गत 3 तारखेला पाकच्या नॅश्नल असेंब्लीत इम्रान खान सरकारविरोधातील अविश्वास ठरारावर मतदान होणार होते. त्यात इम्रान यांची खूर्ची जाणे जवळपास निश्चित होते. पण, ऐनवेळी उपसभापतींनी संविधानाचा दाखला देत खेळ बदलला. अविश्वास ठराव फेटाळला गेला व त्यानंतर काही वेळातच संसदही बरखास्त करण्यात आली. या घटनेमुळे पाकिस्तानी जनतेत किती रोष निर्माण झाला? याचा प्रत्यय इम्रान यांना एका लाईव्ह सेशनमध्ये आला. या सेशनमध्ये इम्रान जनतेच्या प्रश्नांना थेट उत्तरे देत होते. त्यात एका व्यक्तीने त्यांचा उल्लेख माकड व निर्लज्ज म्हणून केला. यामुळे इम्रान यांची चांगलीच पंचाईत झाली.

प्रकरण काय?

इम्रान खान यांनी आपली सत्ता वाचवण्यासाठी उपसभापतींच्या मदतीने अविश्वास ठराव फेटाळून लावण्याचा कट रचला होता. यावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी व जनक्षोभ शांत करण्यासाठी इम्रान अनेकदा टीव्हीवर अवतरले. यात कधी त्यांनी देशाला संबोधित केले, तर कधी फोन कॉल्सना उत्तरे दिली. बहुतांश कॉलर्स हे पूर्वनियोजित होते. म्हणजे इम्रान यांचे समर्थक. पण, त्यानंतरही एक गडबड झालीच.

याकूब साहब यांचा अंदाज

घटना रविवारची आहे. इम्रान आपल्या लाईव्ह सेशनमध्ये जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देत होते. तेव्हा एक कॉलर लाईनवर आला. हे महोदय आपल्या ढंगात काय म्हणाले ते वाचा. अँकर म्हणाला -वजीर ए आजम (पंतप्रधान) साहेबांना प्रश्न विचारा. पण, प्रथम आपले नाव सांगा.

संपूर्ण चर्चेचा आनंद घ्या

कॉलर -मी चोलिस्तान येथून मोहम्मद याकूब कुरेशी बोलत आहे. पंतप्रधानांना माझा एक प्रश्न आहे. तुम्ही तर शेवटच्या चेंडूपर्यंत लढण्याचा दावा केला होता. त्यानंतर तुम्हाला काय झाले? हवा निघाली की हवा टाइट झाली? तुम्हाला तर पळून जावे लागले. तुम्ही विरोधक व मौलाना फजल उर रहमान (विरोधकांची आघाडी पीडीएमचे प्रमुख) यांच्या भीतीमुळे अविश्वास ठरावाला सामोरे न जाता आर्टिकल 5 चे कारण देत पळून गेला काय? दुसरी गोष्ट म्हणजे या प्रकारानंतरही तुमच्या चेहऱ्यावर लाज नावाची गोष्ट दिसून येत नाही. जनतेचीही तुम्हाला कोणती काळजी दिसून येत नाही. तुम्ही खूर्चीला चिकटून बसल्यासारखे वाटत आहे. तुम्ही या खूर्चीसाठी माकडासारखे चाळे करत आहात.
(एवढे ऐकून भंबेरी उडालेल्या इम्रान यांनी अँकरला हा कॉल कट करण्याची सूचना केली)

त्यानंतर अँकरने याकूब यांना टोकले. म्हणाले -तुम्ही केवळ प्रश्न विचारा ते ही संक्षिप्त स्वरुपात. याकूब यांचे कॉलमध्ये शेवटचे शब्द होते -खान साहेब असे नसते.

बातम्या आणखी आहेत...