आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची खुर्ची धोक्यात आहे. सर्वात मोठी विरोधी आघाडी पीडीएममध्ये (पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट) सहभागी नवाज शरीफ यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीगने(पीएमएल-एन) सरकारला घेरण्यासाठी अविश्वास प्रस्तावाच्या तयारीला वेग आणला आहे. पीएमएल-एनचे अध्यक्ष आणि नवाज शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ यांनी पक्षातून फुटलेला गट पीएमएल-क्यूचे अध्यक्ष शुजात चौधरी यांच्याशी चर्चा केली. पाकिस्तानच्या राजकारणात त्यास “मिलाप’ म्हटले जात आहे. दोन्ही पक्षांमध्ये १६ वर्षांनंतर चर्चा झाली.
माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीनेही(पीपीपी) इम्रान सरकारविरुद्धचा विरोध वाढवला आहे. मोर्चे काढले जात आहेत. पीपीपीचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनीही पीएमएल-क्यूचे अध्यक्ष शुजात चौधरी यांच्याशी चर्चा करून विरोधकांसोबत येण्याचे निमंत्रण दिल्याचे सांगितले जाते. मात्र, यामुळे राजकारण तापले आहे.दरम्यान, सोमवारी इम्रान खान यांनी पीएमएल-क्यू सरकारसोबत कायम राहील,असा दावा केला आहे.
अविश्वास प्रस्तावाची तयारी व सरकारच्या काही सहकारी पक्षांनी विरोधकांसोबत केलेल्या चर्चेवर इम्रान यांच्या पक्षाचे खासदार कंवल शोजिब म्हणाले, सरकार ५ वर्षे पूर्ण करेल. सरकारचे सहकारी पक्ष साथ सोडणार नाहीत.
इम्रानना आता लष्कराची मदत नाही : पीरजादा
राजकीय विश्लेषक,तारिक पीरजादा म्हणाले, राजकारणात चर्चा झडत असतात. मात्र, एमक्यूएम-पी व पीएमएल-क्यू यांच्यातील चर्चेमुळे इम्रान सरकारला लष्कराची साथ नसल्याचे निश्चित झाले आहे. पाकिस्तानचे प्रमुख राजकीय विश्लेषक उस्मान खान यांनी दै.भास्करला सांगितले की, सरकारमध्ये सहभागी एमक्यूएम-पी आणि पीएमएल-क्यूकडे सत्तेची चावी आहे. दोन्ही पक्ष सध्या इम्रान सरकारला पाठिंबा देत आहेत. एमक्यूएम-पीकडे नॅशनल असेंब्लीत ७ जागा आणि पीएमएल-क्यूकडे ५ जागा आहेत. दोन्ही पक्षांनी विरोधकांशी हातमिळवणी केल्यास इम्रान सरकार कोसळणे निश्चित आहे. उस्मान म्हणाले, याआधीही इम्रान सरकारविरुद्ध विरोधकांनी जमवाजमव केली,मात्र एकजुटीच्या अभावाने प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.