आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Pakistan Prime Minister Imran Said Wear The Burqa, Avoid Misdeeds; People Shared Their Half Hearted Video

पंतप्रधानांची फजिती:सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानच्या पंतप्रधानांची फजिती, इम्रान म्हणाले- बुरखा घाला; उत्तरादाखल लोकांनी शेअर केला त्यांचा अर्धनग्न व्हिडिओ

इस्लामाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रेडिओवरून लोकांसोबत फोनवर बोलताना त्यांनी हा सल्ला दिला.

पाकिस्तानात अत्याचारांच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी पंतप्रधान इम्रान खान यांनी महिलांना सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, अत्याचारापासून वाचायचे असेल तर महिलांनी बुरखा घालावा. यामुळे अशा घटना थांबतील. मात्र, या सल्ल्याचा लोकांवर विपरीत परिणाम झाला व त्यांचे हसू झाले. सोशल मीडियावर लोकांनी त्यांचा एक जुना व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत इम्रान अर्धनग्न असून त्यांच्यासोबत बिकिनीत महिला आहेत. दोघे समुद्रातून बाहेर येत आहेत. “आधी स्वत:चे बघावे’ असे लोकांनी म्हटले आहे.

रेडिओवरून लोकांसोबत फोनवर बोलताना त्यांनी हा सल्ला दिला. एकाने त्यांना विचारले की, देशात होणारे बलात्कार व लैंगिक अत्याचाराच्या घटनांबाबत सरकारची काय योजना आहे? यावर इम्रान खान यांनी देशातील बिघडणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेऐवजी ‘फताशी’ (अश्लीलता) जबाबदार म्हटले. पाकिस्तानात रोज अत्याचाराच्या ११ घटना घडत आहेत. सहा वर्षांत २२ हजारांपेक्षा जास्त घटना घडल्या. फक्त ०.३ टक्के लोकांना शिक्षा झाली.

बातम्या आणखी आहेत...