आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानमध्ये पुन्हा माणुसकीला काळिमा:पंजाबमध्ये पतीला दोरीने बांधून 5 जणांनी गरोदर महिलेवर केला बलात्कार

लाहोरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातून माणुसकीला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. येथे पाच जणांनी घरात घुसून गर्भवती महिलेवर बलात्कार केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, झेलम शहरात पाच सशस्त्र पुरुष घरात घुसले आणि नंतर पीडितेच्या पतीला दोरीने बांधून गरोदर पत्नीवर बलात्कार केला.

ही बातमी समोर आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हेगारांना पकडण्यासाठी मोहीम तीव्र केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, गरोदर​​​​​​​ महिलेची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून तिच्या रक्ताचे नमुनेही फॉरेन्सिक तपासणीसाठी लाहोरला पाठवण्यात आले आहेत.

कराचीमध्ये चालत्या ट्रेनमध्ये गँगरेप
गेल्या महिन्यात 27 मे रोजी कराचीतील एका तरुणीवर धावत्या ट्रेनमध्ये सामूहिक बलात्कार झाला होता. कराची येथील तरुणी मुलतान येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी गेली होती. काही गोष्टीवरून वाद झाला आणि तरुणी रेल्वे स्टेशनवर आली आणि कराचीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसली.

मुलीकडे तिकीट नव्हते. इतक्यात दोन तिकीट तपासनीस आले. त्यांनी तरुणीला गर्दीच्या जनरल डब्यातून एसी डब्यात जाण्यास सांगितले. ती मुलगी एसी डब्यात गेल्यावर या तिकीट तपासनीसचे प्रभारीही तेथे आले. तिघांनीही मुलीवर बलात्कार केला.

पंजाबमध्ये सहा महिन्यांत 2,439 महिलांवर बलात्कार झाला
पंजाब माहिती आयोगाच्या अहवालानुसार, गेल्या सहा महिन्यांत राज्यात एकूण 2,439 महिलांवर बलात्कार करण्यात आला. यावेळी ऑनर किलिंगच्या नावाखाली 90 जणांची हत्या करण्यात आली. गेल्या वर्षीच्या 'ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2021' नुसार लैंगिक समानतेच्या बाबतीत 156 देशांच्या यादीत पाकिस्तान 153व्या स्थानावर आहे. "22,000 प्रकरणांमध्ये, फक्त 77 आरोपी दोषी आढळले आणि दोषी सिद्ध होण्याचे प्रमाण फक्त 0.3% आहे," असे अहवालात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...