आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तान:दाऊद कराचीत असल्यावरून पाकचे घूमजाव; प्रतिबंधित यादीत नाव असल्याचे केले मान्य

इस्लामाबाद/ नवी दिल्ली5 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

पाकिस्तानने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम कराचीत असल्याच्या गोष्टीवरून घूमजाव केले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी माध्यमातील वृत्ताचे खंडन करत सांगितले की, प्रतिबंधित ८८ दहशतवादी संघटना आणि त्यांच्या सूत्रधारांविरोधात जाहीर यादी संयुक्त राष्ट्राद्वारे देण्यात आलेल्या माहितीवर आधारित आहे.

रेडिओ पाकिस्तानने सांगितले, परराष्ट्र मंत्रालयाने (पाकिस्तान) भारतीय माध्यमांतील काही गटांनी केलेला दावा फेटाळला आहे. पाकिस्तान वैधानिक नियामक आदेशांच्या माहितीच्या आधारे त्यांच्या भागातील काही सूचीबद्ध व्यक्ती असल्याचे मान्य करत आहे. मात्र हा दावा निराधार आहे.

दहशतवाद निधीवर लक्ष ठेवणारी संस्था एफएटीएफच्या ग्रे यादीतून येण्यासाठी पाकिस्तानने १८ ऑगस्टला ८८ दहशतवादी संघटना आणि त्यांच्या सूत्रधारांवर कारवाई करत त्यांच्यावर बंदी घातली होती. तसेच त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आणि खाते सील करण्याचे आदेश दिले होते. यात दाऊदचा कराचीतील पत्ता आणि मालमत्तांचा उल्लेख आहे. या यादीत मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद आणि दहशतवादी मसूद अझहरचेही नाव आहे. १९९३ च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार दाऊद इब्राहिम पाकिस्तानातील कराचीत असल्याचा दावा भारताचा असून दाऊदला सोपवण्याची मागणी पाकिस्तानकडे करत असतो. भारताच्या मागणीवरून यूएनने २००३ मध्ये दाऊद इब्राहिमला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले होते. पॅरिस येथील एफएटीएफने जून २०१८ मध्ये पाकला ग्रे यादीत टाकले होते आणि २०१९ च्या अखेरपर्यंत कार्ययोजना लागू करण्याचे सांगितले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser