आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तान:सियालकोटच्या आर्मी भागात एकापाठोपाठ एक बॉम्बस्फोट, येथे पाकिस्तानी सैन्याचा मोठा तळ, मोठे नुकसान झाले असल्याची शक्यता

सियालकोट2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानी लष्कराच्या सियालकोट लष्करी तळावर स्फोट झाले आहेत. त्यामुळे झालेल्या नुकसानीबाबत सध्या फारशी माहिती मिळालेली नाही. स्फोटांचे आवाज अनेक किलोमीटर दूर ऐकू आल्याचे स्थानिक माध्यमांनी सांगितले.

पाकिस्तानी वृत्तपत्र डेली मिलापचे संपादक ऋषी सुरी यांनी ट्विट केले की, सियालकोटच्या लष्करी तळावर अनेक स्फोट झाले आहेत. हा शस्त्रसाठा भाग असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सर्वत्र ज्वाळा दिसत आहेत. या घटनेचे कारण अद्याप समजू शकलेली नाही.

या घटनेत आतापर्यंत कोणाचाही मृत्यू झाला नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. अद्याप या स्फोटांबाबत पाकिस्तानी लष्कराकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

हा तळ 1852 मध्ये बांधण्यात आला होता
उत्तर पाकिस्तानमध्ये असलेल्या सियालकोटमध्ये त्यांच्या सैन्याचा मोठा तळ आहे. सियालकोट कँट क्षेत्र हा पाकिस्तानमधील सर्वात जुने आणि महत्त्वाचे छावणी क्षेत्र आहे. 1852 मध्ये ब्रिटिश इंडियन आर्मीने त्याची स्थापना केली होती.

बातम्या आणखी आहेत...