आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Pakistan | Snowfall Muree | Marathi News | Tourist Vehicles Stuck Heavy Snowfall Muree; 21 Including 10 Children Died, 10 People Frozen In The Car

पाकिस्तानमध्ये बर्फवृष्टीचे भयावह दृश्य:बर्फवृष्टीमुळे अडकले 1000 प्रवाशी वाहने, कडाक्याच्या थंडीत 10 मुलांसह 21 जणांचा मृत्यू

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानमधील पंजाबच्या मुर्री या डोंगराळ प्रदेशात बर्फवृष्टीमुळे सुमारे एक हजारांपेक्षा जास्त पर्यटक रस्त्यातच फसले आहेत. BBC रिपोर्टनुसार, शनिवारी बर्फवृष्टीमुळे अडकलेल्या 10 मुलांसह 21 जणांचा वाहनातच मृत्यू झाला आहे. त्यातील 10 दहा जणांचा मृत्यू वाहनात बसून, तसेच कडाक्याच्या थंडीने झाल्याचे समोर आले आहे.

पाकिस्तानच्या मुर्रीमध्ये प्रचंड बर्फवृष्टीमुळे वाहने अडकली आहेत.
पाकिस्तानच्या मुर्रीमध्ये प्रचंड बर्फवृष्टीमुळे वाहने अडकली आहेत.

कडाक्याच्या थंडीत कारमध्येच 10 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. सोबतच पाकिस्तानमधील पर्यटकांना बर्फवृष्टीमुळे कोण-कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मृतांमध्ये एकाच कुटुंबातील सर्वजण
आपातकालीन रेस्क्यू सर्विस 1122 ने दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये एकाच कुटुंबातील सर्वजणांचा मृत्यू झाला आहे. त्यात एक पोलिस कर्मचारी त्याची पत्नी आणि सहा मुलांचा मृतांमध्ये समावेश आहे. बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पाकिस्तानी सेना बचावकार्यात गुंतली
पाकिस्तानी सेना बचावकार्यात गुंतली

एक लाखांपेक्षा जास्त पर्यटक अडकले
हंगामातील पहिल्या बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक पंजाबच्या मुर्री या भागात पोहोचले होते. शनिवारी घरी परतत असताना मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्यामुळे अनेक पर्यटक वाटेतच अडकले. पाकिस्तानचे गृहमंत्री शेख राशिद यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून एक लाखांपेक्षा जास्त पर्यटक अडकले आहेत. रावलपिंडीचे डिप्टी कमिश्नर यांनी अशी मागिती दिली आहे की, आतापर्यंत 23 हजार जणांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आले आहे. तर सुमारे 1000 पेक्षा जास्त प्रवाशी गाड्या अडकलेल्या आहेत. मुर्री या भागात 4 फुटांपर्यंत बर्फवृष्टी झाली आहे. तर शेकडो झाडे देखील पडले आहेत. त्यामुळे रस्ते बंद झाली आहेत.

एक हजारांपेक्षा जास्त वाहने अडकल्याची भिती
एक हजारांपेक्षा जास्त वाहने अडकल्याची भिती

सेनेची मदत
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादच्या उत्तरेकडे असणाऱ्या मुर्री समुद्र किनाऱ्यापासून सुमारे 7500 फुट उंच ठिकाणी टूरिस्ट डेस्टिनेशन आहे. 19 व्या दशकात ब्रिटिशांनी मेडिकल सेवेसाठी त्याला तयार केले होते. हा संपुर्ण परिसरात डोंगराळ असून, याठिकाणी पर्यटकांनी गर्दी केली आहे. त्यामुळे त्यांना रेस्क्यू करण्यासाठी पाकिस्तान सेनेची मदत घेतली जात आहे.

पाकिस्तानी लष्कर आल्यावर वाहने बाहेर काढण्याचे काम सुरू झाले.
पाकिस्तानी लष्कर आल्यावर वाहने बाहेर काढण्याचे काम सुरू झाले.

स्थानिक करत आहेत मदत
मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्याने पर्यटकांना कारमधून काढून त्यांना सरकारी इमारतीत तसेच शाळेत पोहोचवले जात आहेत. त्याठिकाणी स्थानिक नागरिक पर्यटकांना जेवण आणि गरम कपडे प्रदान करत आहेत.

सेनेचे बचावकार्य सुरू
सेनेचे बचावकार्य सुरू

बर्फवृष्टीमुळे 21 पर्यटकांचा मृत्यू झाला असून, पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी या घटनेमुळे दु:ख व्यक्त केले आहे. इमरान खान यांनी सोशल मीडियावर लिहले आहे की, हवामानाचे भान न ठेवता मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांना सामोरे जाण्यासाठी आणि भयानक बर्फवृष्टीला सामोरे जाण्यासाठी स्थानिक प्रशासनाची पुरेशी तयारी नव्हती. त्याची पडताळणी केली जात आहे. असे इमरान खान यांनी म्हटले आहे.

मुर्रीपासून इस्लामाबादकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत
मुर्रीपासून इस्लामाबादकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत

धोका अजून संपलेला नाही, मग बर्फवृष्टी-पावसाचा अंदाज

हवामान विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे की, सध्या मुर्रीमधील बर्फवृष्टी थांबली आहे. मात्र उद्या पुन्हा पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची दाट शक्यता आहे. गृहमंत्री रशिद शेख यांनी सांगितले आहे की, मुर्रीपासून इस्लामाबादकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. त्याठिकाणी फक्त अत्यावश्यक सेवे देणाऱ्यांनाच जाण्यास मुभा देण्यात आली आहे.

स्थानिक नागरिक पर्यटकांना जेवण आणि गरम कपडे प्रदान करत आहेत.
स्थानिक नागरिक पर्यटकांना जेवण आणि गरम कपडे प्रदान करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...