आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात स्टेडिअममध्ये पोलिस भरती परीक्षा:30 हजार उमेदवार मैदानासह प्रेक्षक गॅलरीत बसले, केवळ 1,167 रिक्त जागा

इस्लामाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्टेडिअममध्ये तुम्ही विविध खेळ खेळताना खेळांडूना पाहीले असेल. पण पाकिस्तानमधील व्हायरल झालेल्या फोटोमध्ये तुम्हाला दिसून येईल की, स्टेडिअममध्ये मैदानी खेळाऐवजी स्टेडिअमला परीक्षा केंद्र बनविण्यात आले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. ज्यात दावा करण्यात आला आहे की, इस्लामाबादच्या स्टेडिअममध्ये बसून सुमारे 30 हजारांहून अधिक लोकांनी पोलिस भरतीसाठी परीक्षा दिली आहे.

आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानमध्ये तरुणांना नोकऱ्या नाहीत. अशा परिस्थितीत इस्लामाबादमध्ये पोलिसांच्या 1,167 रिक्त जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली. तर याला तब्बल तीस हजार उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. संपूर्ण स्टेडिअम परीक्षार्थींच्या गर्दीने भरून गेले. उमेदवार मुला-मुलींनी स्टेडिअमच्या मैदानासह प्रेक्षक गॅलरीत बसून परीक्षा दिली.

फोटोतून पाहा स्टेडिअममधील परीक्षार्थींची गर्दी

इस्लामाबादमधील खचाखच भरलेल्या स्टेडिअममध्ये पोलिस भरती परीक्षेला बसलेले विद्यार्थी
इस्लामाबादमधील खचाखच भरलेल्या स्टेडिअममध्ये पोलिस भरती परीक्षेला बसलेले विद्यार्थी
इस्लामाबादमधील स्टेडिअममध्ये होत असलेल्या पोलीस भरती परीक्षेदरम्यान एक रक्षक परीक्षार्थींमध्ये उभा आहे.
इस्लामाबादमधील स्टेडिअममध्ये होत असलेल्या पोलीस भरती परीक्षेदरम्यान एक रक्षक परीक्षार्थींमध्ये उभा आहे.
स्टेडिअममध्ये एवढी गर्दी जमली होती की लोक प्रेक्षक गॅलरीत बसले होते, त्यांच्यासोबत त्यांना मैदानावर बसावे लागले.
स्टेडिअममध्ये एवढी गर्दी जमली होती की लोक प्रेक्षक गॅलरीत बसले होते, त्यांच्यासोबत त्यांना मैदानावर बसावे लागले.
स्टेडिअममध्ये एवढी गर्दी जमली होती की, परीक्षार्थी प्रेक्षक गॅलरीत बसले होते.
स्टेडिअममध्ये एवढी गर्दी जमली होती की, परीक्षार्थी प्रेक्षक गॅलरीत बसले होते.
इस्लामाबाद स्टेडिअममध्ये परीक्षा देताना विद्यार्थीनी
इस्लामाबाद स्टेडिअममध्ये परीक्षा देताना विद्यार्थीनी

पाकिस्तानमधील बेरोजगारीची स्थिती
पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती तेथील तरुणांकडून सातत्याने रोजगाराच्या संधी हिरावून घेत आहे. पाकिस्तान डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सच्या अहवालानुसार तेथील 31 टक्के तरुणांकडे रोजगार नाही. या 51% बेरोजगारांपैकी 31% महिलांचा समावेश आहे. तर 16 टक्के पुरुषांकडे नोकरी नाही.

तर यातील बहुतांश तरुण पदवीधर आहेत. कामगार दलात तरुणांचा सहभाग अजिबात नाही, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. एकतर ते असे लोक आहेत, ज्यांनी काम मिळण्याची आशा सोडली आहे. दैनंदिन जीवन जगण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून पैसे मिळतात.

पाकिस्तानची आर्थिक स्थिती इतकी बिकट होती की लष्करालाही आवाहन करावे लागले, पाकिस्तानची आर्थिक स्थिती इतकी बिकट झाली आहे की, तिथल्या लष्करालाही त्याची चिंता करावी लागते. 2022 च्या शेवटच्या दिवशी पाकिस्तानचे लष्करप्रमुख सय्यद असीम मुनीर यांनी देशाची अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी सर्व लोकांना आवाहन केले.

बातम्या आणखी आहेत...