आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दहशतवाद्यांची रसद:ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तान अमेरिकी फर्मला शरण! एफएटीएफची २१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान बैठकीची शक्यता

इस्लामाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चार खाेटे दावे : दहशतवादाला आश्रय देत नसल्याचे सिद्ध करण्याचा अट्टाहास

पाकिस्तानने एफएटीएफच्या ग्रे यादीतून बाहेर पडण्यासाठी अमेरिकेतील ह्युस्टन येथील लाॅबिंग फर्म लिंडेन स्ट्रॅटेजिजची सेवा घेतली आहे. अमेरिका व फ्रान्सच्या काही राजकीय गाेटातून हा दावा करण्यात आला. दहशतवाद्यांची आर्थिक रसद राेखण्यात अयशस्वी ठरलेल्या पाकिस्तानला या यादीत समाविष्ट करण्यात आले हाेते. ट्रम्प प्रशासनासमाेर पाकिस्तानचे प्रकरण मांडण्याचे काम ही फर्म करेल. पाकिस्तानविषयीचा अमेरिकेचा दृष्टिकाेन बदलावा, असा त्यामागील उद्देश आहे. यातून अमेरिकेची मदत मिळाल्यास पाकिस्तान ग्रे लिस्टमधून बाहेर पडू शकताे. ही फर्म सरकारशी संबंध निर्माण करणे, रणनीती, व्यापार सल्ला व राजकीय सल्ल्याबाबत तज्ञ मानली जाते. एफएटीएफची बैठक २१ ते २३ आॅक्टाेबरपर्यंत हाेण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानला ग्रे लिस्टमधून बाहेर करण्यासाठी ३९ पैकी १२ देशांचा पाठिंबा हवा आहे. परंतु, एवढ्या देशांचा पाठिंबा मिळेल, असे पाकिस्तानला वाटत नाही. त्यामुळेच अमेरिकाच याबाबत पुरेसा पाठिंबा मिळवू शकताे, असे पाकिस्तानला वाटते. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालय यासंबंधी लिंडेन फर्मशी साैदा करत आहे.

चार खाेटे दावे : दहशतवादाला आश्रय देत नसल्याचे सिद्ध करण्याचा अट्टाहास
सूत्रांच्या मते पाकिस्तानला लिंडेन स्ट्रॅटेजिज अमेरिकी प्रशासनासाेबत आपल्या बाजूने योग्य चर्चा करेल, असे वाटते. त्याशिवाय प्रमुख दाव्यांआधारे पाकचे म्हणणे मांडण्याचा अट्टाहास सुरू आहे.

पहिले खोटे : तालिबान, हक्कानी नेटवर्क पाकमध्ये नव्हे अफगाणमध्ये
तालिबान, हक्कानी नेटवर्क, अल-कायदा व दाएश ग्लाेबल टेररिस्ट ग्रुप अफगाणिस्तानात असल्याचा पाकचा दावा आहे. दहशतवाद्यांकडे पुरेसा पैसा आहे. तालिबान शूरा व हक्कानी नेटवर्क पाकिस्तानच्या क्वेट्टा, बाेलन दर्रा, पेशावर खैबर भागातून त्यांच्या कारवाया चालत नाहीत.
तथ्य: हक्कानी नेटवर्कचा म्हाेरक्या सिराजुद्दीन हक्कानी पाकिस्तानच्या उत्तर वझिरिस्तानात राहताे. ताे तालिबानच्या इशाऱ्यांवर काम करताे.

दुसरे खोटे : पाकिस्तानात लष्कर-ए-ताेयबाचा खात्मा केल्याचा दावा
आता लष्कर-ए-ताेयबा सक्रिय नसल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. दहशतवाद्यांच्या फंडिंगची बहुतांश प्रकरणे जमात-उद-दावा व फलाह-ए-इन्सानियत फाउंडेशनच्या नेत्यांच्या विराेधात दाखल करण्यात आली. या नेत्यांची आेळख पटली आहे.
तथ्य: लष्कर-ए-ताेयबाचा म्हाेरक्या हाफिज सईद मंुबईवरील हल्ल्याचा मुख्य आराेपी आहे. संघटनेची सूत्रे त्याने मुलगा ताल्हाकडे साेपवली.

तिसरे खोटे : मसूद अजहर पाकमध्ये नाही, केवळ काही कार्यकर्ते सक्रिय
बहावलपूरमधून चालवल्या जाणाऱ्या जैश-ए-माेहंमदचा म्हाेरक्या मसूद अजहर येथे नसल्याचे पाकने म्हटले आहे. पाकिस्तानात या संघटनेबाबत केवळ सहानुभूती असलेले काही सामान्य समर्थक आहेत.
तथ्य: मसूद अजहर गंभीर आजारी आहे. ताे बहावलपूरमध्येच राहताे. त्याचा भाऊ मुफ्ती रउफ असगर आता या संघटनेला पाकिस्तानात चालवताेय. या संघटनेने २०१६ मध्ये पठाणकाेट हल्ला केला हाेता.

चौथे खोटे : फंडिंग प्रकरणातील सर्व दाेषींवर केस दाखल झाल्याचे म्हणणे
पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार दहशतवाद्यांच्या रसद पुरवण्याच्या प्रकरणात सगळे दाेषी ठरले. त्यापैकी दाेन ज्येष्ठ नेत्यांसह २४ विशेष लाेकांना दाेषी ठरवण्यात आले आहे. त्यांच्यावर ६१ केस दाखल झाल्या आहेत.
तथ्य: एफएटीएफच्या २०१९ च्या अहवालानुसार मुंबई हल्ल्यापासून पाकिस्तानात ६६ संघटना व सुमारे ७,६०० व्यक्ती रसद प्रकरणात सामील आहेत. यासंबंधीची तथ्ये प्रस्ताव १३७३ नुसार करण्यात आले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser