आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Pakistan Taliban | PM Imran Khan Speaks On Taliban Terrorism Talks At Uzbekistan Central South Asia Conference

भारतासोबतच्या चर्चेवर पाकिस्तानचे उत्तर:इम्रान म्हणाले - 'सभ्य शेजारी बनून राहण्याची खूप दिवसांपासून वाट पाहतोय, पण काय करावे, संघाची विचारसरणी आडवी आली'

ताशकंदएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • इम्रान म्हटले होते - काश्मिरमधील जुनी परिस्थिती पूर्ववत झाली तर चर्चेसाठी सहमत

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या चर्चेसंदर्भात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी धक्कादायक विधान केले आहे. उझबेकिस्तानमध्ये सुरू असलेल्या मध्य दक्षिण आशिया परिषदेत दाखल झालेल्या इम्रान यांना प्रश्न विचारण्यात आला की, दहशतवाद आणि चर्चा एकत्र चालू शकतात का? न्यूज एजेंसी ANI ने म्हटले की, हा भारताचा त्यांना सवाल आहे.

या प्रश्नावर इम्रान खान म्हणाले, 'आम्ही दिर्घकाळापासून प्रतिक्षा करत आहोत की, आम्ही भारताचे सुसंस्कृत शेजारी बनून राहू, पण काय करावे RSS ची विचारसरणी आडवी आली.'

यानंतर त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, तुमच्यावर आरोप लावले जात आहेत की, तालिबानवर तुमचे नियंत्रण नाही, मात्र इम्रान यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. इम्रान यांच्या अंगरक्षकांनी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला अडवले.

या वर्षीच म्हटले होते - काश्मिरमधील जुनी परिस्थिती पूर्ववत झाली तर चर्चेसाठी सहमत
इम्रान खान यांनी यावर्षी जूनमध्ये म्हटले होते की, जर काश्मीरमधील जुनी परिस्थिती बहाल करण्यासाठी भारताने रोडमॅप बनवला तर आम्ही त्यांच्यासोबत चर्चेसाठी तयार आहोत. त्यांनी म्हटले होते की, भारताने पाकिस्तानला सांगावे की, काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय परत घेण्यासाठी पाऊले उचलावीत. काश्मीरचे स्पेशल स्टेटस संपवणे इंटरनॅशनल लॉ आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या नियमांचे उल्लंघन आहे.

PM सोबत काश्मीरी नेत्यांच्या चर्चेमध्येही उपस्थित करण्यात आला होता सवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 24 जूनला काश्मीरी नेत्यांसोबत बैठक घेतली होती. यामध्ये काश्मीरमध्ये पुन्हा निवडणुका करणे आणि परिसीमनच्या मुद्द्यावर चर्चा झाली होती. मोदींनी म्हटले होते की, ते दिल्ली आणि काश्मीरमधील मनातील अंतर कमी करु इच्छितात. बैठकीमध्ये सामील पीडीपीचे प्रमुख महबूबा मुफ्ती यांनी म्हटले होते की, ज्या प्रकारे भारत चीनसोबत चर्चा करत आहे, त्याच प्रकारे त्यांना पाकिस्तानसोबतही पुन्हा चर्चा सुरू करायला हवी.

बातम्या आणखी आहेत...