आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • International
 • Terrorists Have Better Weapons Than Pakistan Army, 21 Jawans Martyred In 16 Days; Taliban Attacks With American Weapons

चिंता:पाकिस्तानी लष्करापेक्षा दहशतवाद्यांकडे चांगली शस्त्रे, 16 दिवसांत 21 जवान शहीद; अमेरिकन शस्त्रे घेऊन तालिबानचे हल्ले

25 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
हे छायाचित्र 17 ऑगस्ट 2021 चे आहे. तालिबानने या पद्धतीने मीडियासमोर पोज दिली होती.  - Divya Marathi
हे छायाचित्र 17 ऑगस्ट 2021 चे आहे. तालिबानने या पद्धतीने मीडियासमोर पोज दिली होती. 

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा राज्यातील खुर्रम जिल्ह्यात शनिवारी दहशतवादी हल्ल्याच्या दोन घटना घडल्या. याआधी गुरुवारी 8 शिक्षकांव्यतिरिक्त 7 जवान शहीद झाले होते. या राज्यात 16 दिवसांत एकूण 21 पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत. प्रत्युत्तरात केवळ दोन दहशतवादी मारले गेले आहेत.

अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या या राज्यात पाकिस्तानी लष्कर दोन महिन्यांपासून कारवाया करत आहे. आतापर्यंत तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचा (टीटीपी) वरचष्मा दिसत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे टीटीपीकडे पाकिस्तानी सैन्यापेक्षा चांगली शस्त्रे आणि हत्यारे आहेत. ही तीच शस्त्रे आहेत जी अमेरिकन सैन्याने ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानातून परतताना सोडून दिली होती.

अलीकडेच हा फोटो कादिर युसुफझाई या तालिबानचे कव्हरेज करणाऱ्या पत्रकाराने पोस्ट केला होता. कादिर यांच्या म्हणण्यानुसार आता पाकिस्तानी लष्कर बॅकफूटवर आले आहे.
अलीकडेच हा फोटो कादिर युसुफझाई या तालिबानचे कव्हरेज करणाऱ्या पत्रकाराने पोस्ट केला होता. कादिर यांच्या म्हणण्यानुसार आता पाकिस्तानी लष्कर बॅकफूटवर आले आहे.

सौदी अरेबियाच्या वृत्तपत्राचा इन्व्हेस्टिगेटिव्ह अहवाल

 • सौदी अरेबियातील वृत्तपत्र 'द नॅशनल'ने केलेल्या तपासात काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. त्यानुसार, तालिबान (अफगाण आणि पाकिस्तान) च्या बाबतीत त्यांची प्रत्येक चाल उलटी ठरत आहे, हे आता पाकिस्तानच्या सुरक्षा अधिकाऱ्यांना मान्य करावे लागले आहे.
 • टीटीपी आणि अफगाण तालिबान पाकिस्तानी सैन्यावर हल्ले करत आहेत. दररोज पोलिस आणि लष्कराचे जवान मारले जात आहेत. एवढेच नाही तर बलुचिस्तानच्या बंडखोर संघटनांनीही त्यांच्याशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे आता लष्कराचे मोठे नुकसान होत आहे.
 • पाकिस्तानचे सुरक्षा तज्ज्ञ रफिकुल्लाह काकर म्हणाले की, ‘तालिबानला आता हवाई हल्ल्याचा धोका नाही, कारण अमेरिका तेथून मागे गेली आहे. पारंपारिक युद्धात शस्त्रांचा दर्जा खूप महत्त्वाचा असतो, या बाबतीत आता दहशतवाद्यांनी बाजी मारली आहे. पाकिस्तानी लष्कराकडे शस्त्रे, उपकरणे आणि तंत्रज्ञान नाहीत? त्यामुळे ते दररोज हल्ले करतात आणि पाकिस्तानचे सैनिक मारले जातात.

लष्करी अधिकाऱ्यांचे पलायन, दहशतवाद्यांचे नाही

 • काकर पुढे म्हणाले की, ‘तालिबान आता त्यांना पाहिजे तिथे हल्ले करत आहेत. त्यांनी गुरुवारीच 7 जवानांना ठार केले. आता दहशतवाद्यांऐवजी लष्कराला जीव गमवावा लागत आहे. फेब्रुवारीमध्ये मशिदीवर हल्ला झाला होता. 107 पोलिस शहीद झाले. रोज सैनिक मारले जात आहेत. एका वर्षात दहशतवादी हल्ल्यांमध्ये 37% वाढ झाली आहे. यादरम्यान 419 जणांचा मृत्यू झाला. यापैकी 65% सैनिक किंवा पोलिस होते.
 • रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये सुमारे 7.2 अब्ज डॉलरची शस्त्रे आणि इतर उपकरणे सोडली आहेत. प्रत्यक्षात ही रक्कम जवळपास दुप्पट आहे. जरा कल्पना करा, पाकिस्तानचे वार्षिक संरक्षण बजेटही तेवढे नसते. तालिबान लष्कराला लक्ष्य करत असेल तर बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) चीनने गुंतवणूक केलेल्या ठिकाणांना लक्ष्य करत आहे. चिनी नागरिकही मारले जात आहे. पाकिस्तानी सैन्य असहाय्य आहे.
 • या हल्ल्यांमुळे चीन आणि पाकिस्तानमधील संबंधही बिघडत आहेत. दोन वर्षांत 23 चिनी नागरिक दहशतवादी हल्ल्यात मारले गेले आहेत.

एका वर्षात 118 पोलिस शहीद

 • पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, 2022 मध्ये एकट्या खैबर पख्तूनख्वामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये 118 पोलिसांचा मृत्यू झाला होता. दोन लष्करी तळांवर हल्ले झाले. 29 जवान शहीद झाले.
 • रिपोर्टनुसार, पाकिस्तानी लष्कराकडे एवढी छोटी शस्त्रे नाहीत, जी आता दहशतवाद्यांकडे आहेत. त्याच्याकडे नाईट व्हिजन गॉगल, हेल्मेट, बुलेटप्रूफ जॅकेट आणि इतर हायटेक उपकरणे आहेत. त्यांनी इतर देशांतून गुप्त प्रशिक्षण घेतले. पाकिस्तानकडे स्पर्धा करण्यासाठी पुरेसे बजेट नाही. त्यांना बजेट मिळाले तरी आता ते केवळ चीनकडून शस्त्रे खरेदी करू शकतात, भारताच्या दबावामुळे इस्रायल किंवा अमेरिका त्यांना शस्त्रे विकणार नाहीत.
 • काकर म्हणतात की, दहशतवाद्यांकडे सध्या M24 स्निपर रायफल, M4 कार्बाइन ट्रायझोकॉन व्हिजन स्कोप आणि M-16A4 रायफल्स आहेत. पाकिस्तानकडे जड मशीन गन आहेत, पण त्या हलवायला खूप वेळ आणि मनुष्यबळ लागते. अशी सुमारे 6 लाख शस्त्रे तालिबानकडे आहेत. अलीकडेच एका ठिकाणी दहशतवादी असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. हल्ल्यासाठी सैन्य बाहेर पडले, यादरम्यान दहशतवाद्यांनी केला हल्ला, किती जवान शहीद झाले? आजपर्यंत सांगितलेले नाही. याची बातमीच गायब झाली आहे.

रशियन आणि अमेरिकन शस्त्रांसह सशस्त्र

1989 मध्ये रशियन सैन्याने माघार घेतल्यानंतर, प्रथम मुजाहिदीन आणि नंतर तालिबान रशियन एके 47 सह T-55 टॅंकवर दिसले आणि आता तेच तालिबानी सैनिक अमेरिकन बनावटीच्या M16 रायफलसह अमेरिकन हमवी आर्मर्ड वाहनांवर दिसत आहेत.

गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या फोर्ब्स मासिकाच्या अहवालानुसार, अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये 8,84,311 लष्करी उपकरणे सोडली आहेत. यामध्ये M16 रायफल, M4 कार्बाइन, 82 मिमी मोर्टार लाँचर यांसारखी पायदळ शस्त्रे तसेच हमवी, ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर, A29 लढाऊ विमाने, रात्रीचा गॉगल, दळणवळण आणि पाळत ठेवण्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणे यांचा समावेश आहे.

2003 पासून, तालिबान आणि अल-कायदा विरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या अमेरिकेने अफगाण सैन्य आणि पोलिसांसाठी शस्त्रे आणि प्रशिक्षणावर 83 अब्ज डॉलर किंवा 6 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला होता. अफगाणिस्तानमध्ये सोडलेल्या लष्करी उपकरणांमध्ये 5.99 लाखांहून अधिक जिवंत शस्त्रे, 76 हजारांहून अधिक लष्करी वाहने आणि 208 लष्करी विमानांचा समावेश आहे. आता ते अफगाण आणि पाकिस्तानी तालिबान वापरत आहेत.

बायडेन प्रशासन सत्य लपवत असल्यचा आरोप

विशेष बाब म्हणजे जो बायडेन प्रशासन अफगाणिस्तानसाठी खरेदी केलेल्या शस्त्रास्त्रे आणि लष्करी उपकरणांचे ऑडिट रिपोर्ट लपवत आहे. फोर्ब्स डॉट कॉम नुसार, या संदर्भातील दोन महत्त्वाचे अहवाल गेल्या वर्षाच्या सुरुवातीलाच सरकारी वेबसाइटवरून गायब झाले होते.

अमेरिकेतील सरकारी खर्चाशी संबंधित वॉच डॉग ओपन द बुक्स डॉट कॉम (openthebooks.com) ने हे दोन्ही अहवाल आपल्या वेबसाइटवर पोस्ट केले आहेत.

हेलिकॉप्टर आणि लढाऊ विमानांचे भाग काळ्या बाजारात

 • अमेरिकन लढाऊ विमानांबाबत तज्ज्ञांची दोन मते आहेत. पहिली- तालिबानला या अमेरिकन विमानांचा आणि हेलिकॉप्टरचा वापर माहीत नाही, पण त्यांचे भाग चीन आणि पाकिस्तानसारख्या देशांना महागात विकू शकतात. हे छुप्या पद्धतीने होत आहे हे सत्य आहे. अफगाण सैन्याला दिलेल्या काही विमानांची इंधन टाकी 35 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 25 लाख रुपयांना विकली जाऊ शकते.
 • काही तज्ञांचा असा विश्वास आहे की, PC-12 टोही आणि पाळत ठेवणारी विमाने नवीनतम तंत्रज्ञानाने बनलेली आहेत. ही विमाने तालिबानच्या ताब्यात आहेत ही वस्तुस्थिती अतिशय अस्वस्थ करणारी आहे. जानेवारीमध्ये, जेव्हा पाकिस्तान आणि अफगाण सैन्य आमनेसामने होते, तेव्हा दोन दिवसांच्या चकमकीत 16 पाकिस्तानी सैनिक ठार झाले होते. तेव्हा पाकिस्तानला कळले की, तालिबान आता त्यांच्यावर किती भारी पडणार आहे आणि हे का होत आहे.
 • 2017 मध्ये यूएस आर्मीला 1250 कोटी रुपयांचे स्कॅन ईगल ड्रोन गमवावे लागले होते. हे ड्रोन अफगाण नॅशनल आर्मीला त्यांच्या स्वतःच्या संरक्षणासाठी देण्यात आले होते. अफगाण सैन्याने त्यांचा लगेच वापर केला नाही, मात्र काही महिन्यांनी अफगाण लष्कराला दिलेले ड्रोन गायब असल्याचे दिसून आले.
ऑगस्ट 2021 मध्ये, अमेरिकन सैन्य परतल्यानंतर तालिबानने या शैलीत पोझ दिली होती.
ऑगस्ट 2021 मध्ये, अमेरिकन सैन्य परतल्यानंतर तालिबानने या शैलीत पोझ दिली होती.

तालिबाननेही रहस्य लपवले नाही

गेल्या वर्षी म्हणजे मार्च 2022 मध्ये तालिबानने अमेरिकन वाहने आणि रशियन हेलिकॉप्टरच्या सहाय्याने काबूलमध्ये शक्तीप्रदर्शन केले. परेडच्या माध्यमातून तालिबानने दाखवून दिले की, ते कसे दहशतवादी संघटनेतून कायमस्वरूपी लष्करात बदलले आहेत.

या परेडमध्ये 250 नवीन प्रशिक्षित सैनिकही सहभागी झाले होते. यात ट्रेंड पायलट देखील होते. या परेडमध्ये अमेरिकन एम117 बख्तरबंद सुरक्षा वाहनांचा समावेश होता. तालिबानच्या सैनिकांकडे M4 असॉल्ट रायफल होती. वर MI-17 हेलिकॉप्टर गस्त घालत होते.