आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानच्या वस्त्रोद्योग क्षेत्राने कोरोना महामारीदरम्यान भारत-बांगलादेशने ऑर्डर रद्द केल्यानंतर नवीन विक्रम स्थापन केला आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे वाणिज्य सल्लागार अब्दुल रजाक दाऊद यांच्यानुसार, जूनमध्ये संपणाऱ्या वर्षात गेल्या वर्षीच्या तुलनेत कापड निर्यात विक्रमी ४०% वाढून २१ अब्ज डॉलर म्हणजे, १.५७ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. दाऊद म्हणाले, येत्या वित्त वर्षात हा आकडा १.९४ लाख कोटी होईल. हा गेल्या वर्षीचा निर्यातीचा आकडा पार करेल. पाकिस्तानचा कापड उद्योग वेगाने वाढत आहे.
पाक अमेरिका आणि युरोपमध्ये खरेदीदारांसाठी डेनिम जीन्सपासून टॉवेलपर्यंत पुरवठा करतो. वस्त्रोद्योग क्षेत्र पाकिस्तानच्या निर्यातीच्या जवळपास ६०% आहे. २०२० मध्ये महामारी वाढली तेव्हा पाकिस्तानने भारत आणि बांगलादेशसारख्या देशांशी स्पर्धेसाठी कारखाने उघडण्यास मंजुरी दिली आणि टार्गेट कॉर्प आणि हॅन्सब्रँड्स हंकसह अनेक जागतिक ब्रँड्कडून ऑर्डर मिळवली आहे. दाऊद म्हणाले, आम्हाला खूप साऱ्या ऑर्डर बांगलादेश आणि भारतातून शिफ्ट करून दिल्या होत्या. चांगली बाब म्हणजे, आम्ही आता बांगलादेशचे स्पर्धक होत आहोत. तीन-चार वर्षांपूर्वी बांगलादेशने आम्हाल खूप मागे टाकले होते.
दाऊद म्हणाले, सरकार येत्या महिन्यात आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि मध्य आशियासारख्या नव्या बाजारांत निर्यातीसाठी प्रोत्साहन देण्याचा प्रस्ताव जारी करण्याचीही योजना आखत आहे. दक्षिण आशियात प्रतिस्पर्धींच्या तुलनेत दुप्पट कर कपात, स्वस्त कर्ज आणि वीजपुरवठ्यासह अन्य उपायांतून कापड निर्यातीस प्रोत्साहन मिळाले आहे. २०१८ नंतर अमेरिकी डाॅलरच्या तुलनेत आमच्या रुपयात ६०% घसरणीमुळेही आम्हाला खूप मदत मिळाली. आर्थिक निर्बंधांबाहेर निघण्याचा प्रयत्न आहे. १९८० पासून आतापर्यंत १३ वेळा आयएमएफकडून मदत मागितली आहे. दाऊद म्हणाले, आम्ही देशाची उच्च आयात कमी करू.
विशेषत: पेट्रोलियम उत्पादन आणि लस खरेदी.
दाऊद म्हणाले, या वर्षी चांगल्या पिकामुळे धान्य आयातीत घसरण येईल. आम्ही आता ट्रकच्या मुक्त वाहतुकीला मंजुरी देऊन मध्य आशियाई देशांसोबत व्यापार वाढवू. चालू वित्त वर्षाच्या सहा महिन्यांत आमचा व्यापार गेल्या वर्षीच्या १.४ कोटी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत वाढून १२ कोटी अमेरिकी डॉलर झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.