आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानमध्ये गेल्या काही काळापासून दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर देशात हैदोस घातलेल्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान अर्थात टीटीपीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाकिस्तानने अफगाण तालिबान प्रमुख हैबुतल्लाह अखुंदजादा यांच्याकडे मदत मागितली. पाकिस्तानातल्या पेशावरमधल्या एका मशिदीत टीटीपीने केलेल्या हल्ल्यात 100 हून अधिक लोक मारले गेले आहेत. उमर खालिद खुरासानीच्या मृत्यूचा बदला म्हणून हा हल्ला केल्याचं टीटीपीने स्पष्ट केलं आहे.
पाकिस्तानला दहशतवादाच्या लाटेचा फटका बसला आहे. मुख्यतः देशाच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात आणि खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या सीमेवर असलेल्या बलुचिस्तान आणि पंजाबच्या मियानवली या शहरांनादेखील दशतवादाचा सामना करावा लागत आहे.
सोमवारी पेशावर मशिदीवर झालेल्या हल्ल्यात तालिबानच्या आत्मघातकी बॉम्बरने दुपारच्या नमाजाच्या वेळी स्वत:ला उडवले होते. ज्यात 101 लोक ठार झाले होते आणि 200 हून अधिक जण जखमी झाले होते. शुक्रवारी येथे झालेल्या सर्वोच्च समितीच्या बैठकीत पाकिस्तानच्या नागरी आणि लष्करी नेतृत्वाने तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) वर नियंत्रण ठेवण्यासाठी अफगाण तालिबान प्रमुख हैबुतल्ला अखुंदजादा यांच्या हस्तक्षेपाची मागणी करण्याचा निर्णय घेतला, असे एक्सप्रेस ट्रिब्यून वृत्तपत्राने म्हटले आहे.
शुक्रवारच्या बैठकीला उपस्थित असलेले पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह म्हणाले की, पेशावर मशिदीवरील हल्ल्याचे सूत्रधार अफगाणिस्तानात असू शकतात आणि फेडरल सरकार त्यांच्या अफगाण समकक्षांसोबत हा मुद्दा उपस्थित करेल, असे अहवालात म्हटले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी शुक्रवारी पेशावर हत्याकांड टाळण्यात अपयशी ठरल्याची कबुली दिली. या संकटाचा सामना करण्यासाठी त्यांनी "राष्ट्रीय एकतेचे" आवाहन केले.
डीएनए नमुन्यांद्वारे आत्मघातकी हल्लेखोराची ओळख
पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी पेशावर मशिदीवरील हल्ल्याच्या तपासात त्याच्या डीएनए नमुन्यांद्वारे आत्मघातकी हल्लेखोराची ओळख केल्याची माहिती आहे. पोलिसांनी सांगितले की, डीएनए चाचणी घेण्यात आली असून तपास अधिकारी बॉम्बरच्या कुटुंबाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
जून 2022 मध्ये सरकारशी सहमती दर्शवून अनिश्चित काळासाठी केलेला युद्धविराम टीटीपीने मागे घेतला आणि गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अतिरेक्यांना सुरक्षा दलांवर हल्ले करण्याचे आदेश दिले.
सत्ताधारी आघाडीने अतिरेक्यांविरुद्ध कठोर उपाययोजना राबविल्या टीटीपीने पंतप्रधान शरीफ यांच्या पीएमएल-एन आणि परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो-झरदारी यांच्या पीपीपीच्या प्रमुख नेत्यांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. टीटीपीचे अल-कायदाशी जवळचे संबंध असल्याचे मानले जाते.
पाकिस्तानला आशा होती की, अफगाण तालिबान सत्तेवर आल्यानंतर टीटीपीच्या कार्यकर्त्यांना हद्दपार करतील. पाकिस्तानविरुद्ध त्यांच्या भूमीचा वापर थांबवतील. परंतु इस्लामाबादसोबतचे संबंध ताणले गेल्याने त्यांनी तसे करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. 2007 मध्ये अनेक दहशतवादी संघटनांचा एक छत्र गट म्हणून स्थापन झालेल्या TTP ने फेडरल सरकारसोबत युद्धविराम रद्द केला आणि त्याच्या अतिरेक्यांना देशभरात दहशतवादी हल्ले करण्याचे आदेश दिले.
अल-कायदाशी जवळीक असलेल्या टीटीपीला पाकिस्तानात 2009 मध्ये लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला, लष्करी तळांवर हल्ले आणि 2008 मध्ये इस्लामाबादमधील मॅरियट हॉटेलवर झालेल्या बॉम्बस्फोटासाठी जबाबदार धरण्यात आले होते. 2014 मध्ये, पाकिस्तानी तालिबानने वायव्येकडील पेशावर शहरातील आर्मी पब्लिक स्कूल (एपीएस) वर हल्ला केला. ज्यात 131 विद्यार्थ्यांसह किमान 150 लोक ठार झाले होते.
इम्रान यांच्या रुग्णालयात दहशतवाद्यांवर उपचार होतो का?
एक प्रत्यक्षदर्शी आणि आयजी शहर गुलाम रसूल यांच्या म्हणण्यानुसार हा दहशतवादी हल्ला होता. खैबर पख्तुनख्वा राज्यातील या शहरात असे हल्ले होत असतात. 2014 मध्ये तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (TTP) येथील आर्मी पब्लिक स्कूलवर (APS) हल्ला केला होता. त्यात 141 लहान मुलांसह एकूण 148 जणांचा मृत्यू झाला होता. टीटीपीने सोमवारच्या हल्ल्याची जबाबदारीही स्वीकारली आहे. येथे वाचा संपुर्ण बातमी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.