आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Pakistan Train Bus Accident | 19 Sikh Pilgrims (Yatries) Killed As Shah Hussain Express Train Bus Accident Today In Pakistan Lahore Sheikhupura

पाकिस्तान:कराचीजवळ बस-ट्रेनच्या भीषण अपघातात 19 शिख भाविकांचा मृत्यू, फाटक नसलेल्या रेल्वे क्रॉसिंगमुळे झाला अपघात

लाहौर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानात शुक्रवारी दुपारी एका ट्रेन-बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात 19 शिख भाविकांचा मृत्यू झाला आहे. शिख भाविकांना घेऊन जात असलेल्या बसची लाहौरवरुन कराचीला जात असलेल्या शाह हुसैन एक्सप्रेससोबत जोरदार धडक झाली. ही टक्कर फारूकाबाद स्टेशनजवळ झाली. पाकिस्तानची न्यूज वेबसाइट ‘द डॉन न्यूज’नुसार, 15 जणांचा जागेवर तर चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

इम्रान खान यांनी दुःख व्यक्त केले

रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, गट नसलेल्या रेल्वे क्रॉसिंगमुळे हा अपघात झाला. या रुटवरुन शाह हुसैन एक्सप्रेस जात होती, यादरम्यान बस ड्रायव्हरने गेट क्रॉस करण्याचा प्रयत्न केला आणि ट्रेनने बसला उडवले. अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेवर पंतप्रधान इम्रान खान यांनी दुःख व्यक्त केले आहे. याप्रकरणी रेल्वेमंत्री मंत्री शेख रशीद यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. हे सर्व शिख भाविक ननकाना साहिब वरुन परत येत होते.

बातम्या आणखी आहेत...