आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाक आर्मीने TTPच्या 33 दहशतवाद्यांना मारले:40 तास चालला होस्टेज ड्रामा, पाकने पाठविलेल्या 16 मौलवींचे तालिबानने ऐकले नाही

इस्लामाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानातील बन्नू जिल्ह्यातील काउंटर टेररिझम सेंटर (CTD) ताब्यात घेणाऱ्या तहरीक-ए-तालिबान (TTP) च्या 33 दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्कराने ठार केले आहे. संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी संसदेत ही माहिती दिली. दरम्यान, या कारवाईत 2 कमांडोही मारले गेले आहेत.

सुमारे तीन दिवसांपासून तहरिक-ए-तालिबानच्या दहशतवाद्यांनी एका मेजरसह चार जवानांना बंदी ठेवले होते. त्यानंतर पाकिस्तानने 16 मौलवींची एक टीम अफगाणिस्तानला चर्चेसाठी पाठवली होती. त्यांचा उद्देश होता की, अफगाण तालिबानला टीटीपीच्या दहशतवाद्यांना आत्मसमर्पणासाठी तयार करतील.

परंतू हा प्रयत्न अयशस्वी ठरला. टीटीपीचे दहशतवादी अफगाणिस्तानात जाण्यासाठी हेलिकॉप्टरची मागणी करत असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. अखेर पाकिस्तानी लष्कराने 40 तास लष्करी कारवाई केली.

या कारवाईचे संपूर्ण श्रेय लष्कराला देताना संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले की, खैबर पख्तूनख्वाचे सरकार दहशतवाद रोखण्यात पूर्णपणे पराभूत झाले आहे.
या कारवाईचे संपूर्ण श्रेय लष्कराला देताना संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले की, खैबर पख्तूनख्वाचे सरकार दहशतवाद रोखण्यात पूर्णपणे पराभूत झाले आहे.

दहशतवाद्यांनी अधिकाऱ्याचीही हत्या केली
टीटीपीच्या दहशतवाद्यांनी खैबर पख्तूनख्वा राज्यातील बन्नू जिल्ह्यातील दहशतवादविरोधी केंद्रावर कब्जा केला. चार जवानांसह काही लोकांना ओलीस बनवण्यात आले. एकाचा खूनही झाला होता. परिस्थिती इतकी वाईट होती की पाकिस्तान सरकार ओलीस सोडण्यास असमर्थ ठरले.

दहशतवाद्यांना अफगाणिस्तानात जायचे होते
सुरक्षा दलांनी संपूर्ण छावणीला चारही बाजूंनी घेरले. लष्कर आणि स्थानिक प्रशासन वाटाघाटीद्वारे ओलिसांची सुटका करण्याचा प्रयत्न करत होते. खैबर पख्तूनख्वा सरकारचे प्रवक्ते मुहम्मद अली सैफ म्हणाले होते- दहशतवाद्यांनी सरकारसमोर एक अट ठेवली आहे, त्यांना सरकारने त्यांना सुरक्षितपणे अफगाणिस्तानात जाऊ द्यावे अशी त्यांची इच्छा आहे.

बन्नू जिल्ह्यातील लष्कराच्या कारवाईदरम्यान काउंटर टेररिझम सेंटरजवळचा परिसर पूर्णपणे रिकामा करण्यात आला होता.
बन्नू जिल्ह्यातील लष्कराच्या कारवाईदरम्यान काउंटर टेररिझम सेंटरजवळचा परिसर पूर्णपणे रिकामा करण्यात आला होता.

चौकशीत पोलिसांकडून बंदूक हिसकावली, नंतर संपूर्ण केंद्र ताब्यात
एका दहशतवाद्याच्या चौकशीदरम्यान टीटीपीच्या काउंटर टेररिझम सेंटरवर कब्जा सुरू झाला. वास्तविक, केंद्रातील एक अधिकारी टीटीपी दहशतवाद्याची चौकशी करत होता. त्याचवेळी दहशतवाद्याने त्याच्या हातातील एके-47 हिसकावून घेतले. त्याच्या साथीदारांची सुटका केली. काही वेळातच सर्व दहशतवाद्यांनी संपूर्ण केंद्रावर ताबा मिळवला आणि अधिकाऱ्यांना कैद केले.

टीटीपी दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या बन्नू जिल्ह्यात सर्वत्र सैन्य तैनात करण्यात आले होते.
टीटीपी दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या बन्नू जिल्ह्यात सर्वत्र सैन्य तैनात करण्यात आले होते.

अधिकाऱ्यांना मारण्याची धमकी
अलजझीराच्या वृत्तानुसार, सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसारित होत आहे. ज्यामध्ये दहशतवादी धमकी देत ​​होते की, जर त्यांना सोडले नाही तर ते कैदेत असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना ठार मारतील.

अमेरिका काय म्हणाली?
टीटीपीशी लढण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानला मदत देऊ केली होती. यूएस स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते नेड प्राइस म्हणाले- आम्ही दहशतवाद्यांना हिंसाचार त्वरित थांबण्याची आणि सर्व कैद्यांची सुटका करण्याची मागणी करतो.

काउंटर टेररिझम सेंटरजवळ भरपूर सैन्य तैनात करण्यात आले होते.
काउंटर टेररिझम सेंटरजवळ भरपूर सैन्य तैनात करण्यात आले होते.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सीमेवर सुमारे 6 महिन्यांपासून प्रचंड तणाव आहे. यापूर्वी तालिबानच्या गोळीबारात अनेक पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला आहे. हा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानच्या परराष्ट्र राज्यमंत्री हिना रब्बानी खार या दोन आठवड्यांपूर्वी अफगाणिस्तानला गेल्या होत्या. त्यांच्यासोबत परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ होते.

विशेष बाब म्हणजे महिलांना सीमाभिंती आणि हिजाबमध्ये कैद ठेवण्याचा सल्ला देणाऱ्या तालिबान सरकारचे अधिकारी हिनाचे स्वागत करण्यासाठी काबूल विमानतळावर पोहोचले तेव्हा ती तिच्या जुन्या ग्लॅमरस स्टाईलमध्ये होती. हिजाब घालणे तर दूरच, तिने डोक्यावर स्कार्फही बांधला नव्हता. पाकिस्तानातील काही मौलवींनी हिनाला अफगाणिस्तानात पाठवण्यास विरोध केला होता.

पाकिस्तानने अफगाण सीमेवर अशा काटेरी तारा लावल्या आहेत. ते तालिबानने उखडून टाकले आहे.
पाकिस्तानने अफगाण सीमेवर अशा काटेरी तारा लावल्या आहेत. ते तालिबानने उखडून टाकले आहे.

सीमावाद हे वादाचे मूळ आहे

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेने विभक्त आहेत. यालाच ड्युरंट लाइन म्हणतात. पाकिस्तान याला सीमारेषा मानतो, पण तालिबान स्पष्टपणे सांगतात की, पाकिस्तानचे खैबर पख्तूनख्वा राज्य त्यांचा भाग आहे. पाकिस्तानी सैन्याने येथे काटेरी तारांचे कुंपण केले आहे.

15 ऑगस्ट 2021 रोजी अफगाणिस्तानची सल्तनत तालिबानने ताब्यात घेतली. 5 दिवसांनंतर म्हणजेच 20 ऑगस्ट रोजी त्यांनी स्पष्ट केले की, तालिबान ड्युरंड लाइन मान्य करत नसल्याने पाकिस्तानला अफगाणिस्तानचा भाग रिकामा करावा लागेल.

पाकिस्तानने याला विरोध करत तेथे लष्कर तैनात केले. यानंतर तालिबानने तेथील पाकिस्तानी चेकपोस्ट उडवून लावले. या भागात अनेक पाकिस्तानी सैनिक मारले गेले असून अनेक तालिबानच्या ताब्यात आहेत. गेल्या आठवड्यातच तालिबानच्या गोळीबारात 6 पाकिस्तानी सैनिक मारले गेले.

तालिबानचे दोन मुख्य गट आहेत. पहिला: अफगाण तालिबान. ते अफगाणिस्तानचे सरकार चालवत आहे. दुसरा: तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान ज्याला सामान्य भाषेत टीटीपी म्हणतात.

अशाप्रकारे पाकिस्तानात तालिबानची भरभराट झाली

पाकिस्तानमध्ये अस्तित्वात असलेल्या सर्व दहशतवादी संघटनांमध्ये तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान सर्वात धोकादायक मानला जातो. ज्याला दहशतवादाची फॅक्टरी म्हटले जाते. मलाला युसूफझाईवरील हल्ल्याची जबाबदारी या संघटनेने घेतली होती. त्यानेच पेशावमधील सैनिक स्कूलवर हल्ला करून 114 मुलांची हत्या केली होती.

2002 मध्ये अमेरिकेच्या कारवाईनंतर अफगाणिस्तानातून अनेक दहशतवादी पळून गेले आणि पाकिस्तानच्या आदिवासी भागात लपून बसले, त्याच वेळी पाकिस्तानी तालिबानची मुळे सुरू झाली होती. या दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू झाली तेव्हा स्वात खोऱ्यात पाकिस्तानी लष्कराला विरोध झाला होता. आदिवासी भागात अनेक बंडखोर गट फोफावू लागले.

अशा परिस्थितीत डिसेंबर 2007 मध्ये बेतुल्ला मेहसूदच्या नेतृत्वाखाली 13 गटांनी तेहरीक म्हणजेच मोहिमेत सामील होण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे संघटनेचे नाव तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान ठेवण्यात आले. थोडक्यात त्याला टीटीपी किंवा पाकिस्तानी तालिबान असेही म्हणतात. ही अफगाणिस्तानच्या तालिबानपासून वेगळी संघटना आहे, पण हेतू कमी-अधिक प्रमाणात सारखाच आहे. दोन्ही संघटनांना शरिया कायदा लागू करायचा आहे.

बातम्या आणखी आहेत...