आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तान सरकारने देशातील औषधांचा तुटवडा दूर करण्यासाठी भारतातून अनास्थेशियासह इतर औषधींची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. लाहोर, खैबर पख्तुनख्वा, सिंध प्रांतासह पंजाबच्या अनेक रुग्णालयात शस्त्रक्रिया ठप्प झाल्या आहेत. उत्पादन खर्चातील वाढीमुळे ही औषदी बाजारपेठेत उपलब्ध होत नाही. पाकिस्तान सरकारने स्थानिक औषधी कंपन्यांना भारत व अमेरिकेतून औषधी खरेदीची परवानगी दिली आहे. पाकिस्तानच्या आरोग्य विभागाचे प्रवक्ता साजिद शाह दैनिक भास्करला म्हणाले, आम्ही आधीपासूनच चीन, इराण, श्रीलंका व भारतासारख्या शेजारी देशांतून अनेक प्रकारची औषधी आयात करत आहोत. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली पुढील मंत्रिमंडळ बैठकीत भारतातून आैषधी आयात करण्याचा प्रस्ताव मांडला जाऊ शकतो. पाकिस्तान फार्मास्युटिकल्स असोसिएशनच्या एका वरिष्ठ सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दैनिक भास्करला सांगितले की, वीज-कच्च्या मालाच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. त्यात रूपया डॉलरच्या तुलनेत घसरणीला आहे.पूर्वी कच्च्या तेलाच्या कंटेनरची किंमत १२०० डॉलर म्हणजेच ९५ हजार रुपये होती. आता ती वाढून १२ हजार डॉलर म्हणजे ९ लाख ५० हजार झाली आहे. सिनेट समितीच्या आकडेवारीवरून पाक दरवर्षी भारतातून १५० प्रकारच्या औषधी व लसी आयात करतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.