आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पाकिस्तानच्या सैन्याने बलुचिस्तानमध्ये गेल्या काही वर्षांत हजाराे विद्यार्थ्यांची हत्या केली. अनेक विद्यार्थ्यांना गुप्त छावण्यांत यातना दिल्या जात आहेत. बलुचिस्तान स्वायत्ततावादी नेता डाॅ. अल्लाह िनजार बलूच यांनी हा दावा केला आहे. पाकच्या निमलष्करी दलाने कराची विद्यापीठाच्या २५ वर्षीय बलूच विद्यार्थ्याची निर्घृण हत्या झाली. त्या पार्श्वभूमीवर निजार यांचे हे वक्तव्य जारी झाले आहे. निमलष्करी जवान हयात नावाच्या विद्यार्थ्याला फरपटत घेऊन गेले हाेते. आई-वडील मुलासाठी दयेची याचना करत हाेते. परंतु सैनिकांना थाेडीदेखील दया आली नाही. त्यांनी हयातवर आठ गाेळ्या डागल्या. डाॅ. निजार म्हणाले, सैनिक तरुणांवर आयडी स्फाेट इत्यादीसारखे आराेप ठेवून अशा प्रकारची कारवाई करतात. पाकने बलूच तरुणांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी शाळा, महाविद्यालये व विद्यापीठांची सूत्रे सैन्याच्या हाती दिली आहेत. या शैक्षणिक संस्थांमध्ये लष्करी छावण्याही आहेत. बलुचिस्तानमध्ये नरसंहार सुरू ठेवून तरुणांचे मानसिक पातळीवर खच्चीकरण करण्याचे पाकिस्तानचे मनसुबेही उघड आहेत.
आक्राेश : मारण्याचा हक्क सैनिकांना काेणी दिला? मातेचा संतप्त प्रश्न
बलुचिस्तानमध्ये विद्यार्थी हयात बलूचच्या हत्येच्या विराेधात आक्राेश दिसून येताे. त्यामुळेच त्याविराेधात हजाराे लाेक निदर्शनात सहभागी झाले हाेते. बलुचिस्तान व पाकिस्तानसह इतर शहरांतही निदर्शने झाली. बलुचिस्तानमधील एक महिला निदर्शक म्हणाल्या, एक आई या नात्याने हयातला गमावणाऱ्या आई-वडिलांचे दु:ख समजू शकते. आई-वडिलांच्या डाेळ्यासमाेर हयातची सैनिकांनी हत्या केली. आपण सर्वांनी मिळून अशा प्रकरणांत आवाज उठवला पाहिजे. सैन्य आमचे घर चालवते? त्यांना हत्या करण्याचा अधिकार काेणी दिला?
अस्मितेचे संकट : बलूच भाषेच्या पुस्तकांवर घातली बंदी
डाॅ. िनजार म्हणाले, पाकिस्तान आमची आेळख, संस्कृती, भाषेला संपूर्णपणे नष्ट करू इच्छिताे. लाहाेर व कराचीमध्ये प्रकाशित पुस्तके बलुचिस्तानमध्ये आणण्यास बंदी आहे. केच जिल्हा व इतर ठिकाणच्या पुस्तकांच्या दुकानांमधून बलूच भाषेतील पुस्तके जप्त करण्यात आली आहेत. त्यावरून पाकिस्तान बलूच राष्ट्राला शिक्षण, ज्ञानापासून दूर ठेवण्याचा कट करत आहे. बलूचचे स्वातंत्र्य संघर्ष आंतरराष्ट्रीय कायदा व जिनिव्हा करारानुसार आहे.
कायदा व्यवस्था : ५३ हजार लाेक बेपत्ता; अपहरण, हत्येची शक्यता
लंडन । ब्रिटनमध्ये बलूच नॅशनल मूव्हमेंटचे अध्यक्ष हकीम बलूच म्हणाले, बलुचिस्तानमध्ये ५३ हजार लाेक बेपत्ता आहेत. या लाेकांचे अपहरण झाले असावे किंवा त्यांची हत्या झाली असावी असा अंदाज आहे. त्यात महिला व मुलांची माेठी संख्या आहे. हयात हे एकच प्रकरण नाही. सैन्याने बलुचिस्तानमध्ये हजाराे विद्यार्थ्यांची हत्या केली. आंतरराष्ट्रीय मानवी हक्क संघटनेने या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची गरज बलूच विद्यार्थी संघटनेने माजी अध्यक्ष करिमा बलूच यांनी व्यक्त केली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.