आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानी पंतप्रधानांचे वादग्रस्त ट्विट:गिलानी ‘पाकिस्तानी’ होते म्हणत एका दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा केला जाहीर; इम्रान खान यांच्यावर टीकेची झोड

नवी दिल्ली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोण आहेत सय्यद गिलानी?

ऑल पार्टी हुरियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष सय्यद अली शाह गिलानी यांचे बुधवारी रात्री उशिरा निधन झाले. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गिलानी यांचे हैदरपोरा येथील राहत्या घरी निधन झाले. गिलानी यांना देशातील विविध पक्षाचे नेते श्रद्धांजली वाहत आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी वादग्रस्त ट्विट करत गिलानी यांना श्रद्धांजली वाहली आहे. यामुळे पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांना टीकेचा सामना करावा लागत आहे.

काय म्हणाले इम्रान खान?
पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन हे वादग्रस्त ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले की, "काश्मिरी नेते सय्यद अली गिलानी यांच्या निधनाची बातमी ऐकून अत्यंत दु:ख झाले. गिलांनी यांनी आयुष्यभर आपल्या लोकांसाठी आणि त्यांच्या आत्मनिर्णयाच्या अधिकारासाठी लढा दिला. या दरम्यान, त्यांना अनेक यातना सहन कराव्या लागल्या तरीही त्यांचा निर्धार कायम राहिला."

पाकिस्तानमध्ये एका दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
इम्रान खान यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले की, "आम्ही पाकिस्तानमध्ये त्याच्या धाडसी संघर्षाला सलाम करतो आणि त्याचे शब्द लक्षात ठेवा. 'आम्ही पाकिस्तानी आहोत आणि पाकिस्तान आमचा आहे'. पाकिस्तानचा राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला असून देशात एका दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे" असे ट्विट करत म्हटले आहे.

कोण आहेत सय्यद गिलानी?
गिलानी हे काश्मीरमधील सक्रिय फुटीरतावादी नेते होते. 29 सप्टेंबर 1929 रोजी सोपोर येथे जन्मलेल्या गिलानी यांना हुर्रियत कॉन्फरन्सचा उदारवादी चेहरा मानले जात होते. गिलानी यांनी महाविद्यालयीन शिक्षण लाहोरमधून घेतले होते. त्यावेळी लाहोर हा भारताचा एक भाग होता. काश्मीरच्या सोपोर विधानसभा मतदारसंघातून ते तीन वेळा आमदार राहिले होते.

गिलानी यांनी काश्मीरला भारताचा भाग मानले नाही आणि ते वेगळे करण्याची मागणी केली. 1990 च्या दशकात त्यांनी दहशतवादी हिंसा आणि अलिप्ततावादाच्या राजकारणाचे गट एकत्र करून सर्वपक्षीय हुरियत कॉन्फरन्सची स्थापना केली. यामध्ये 1987 च्या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सला विरोध करणारे सर्व गट सामील झाले होते.

बातम्या आणखी आहेत...