आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्तारपूर कॉरिडॅार:पाकिस्तान म्हणाले - या...भारतीयांशिवाय कॉरिडॅार सुना सुना, 1,700 काेटी रुपये खर्च करून झाला गुरुद्वाराचा जीर्णाेद्धार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुद्वारा कर्तारपूर साहिब येथून ‘भास्कर’साठी रिफतउल्ला ओराक्जई
संध्याकाळचे ५ वाजले आहेत. भारत-पाकिस्तान सीमेवरील भारत-पाक सीमेवर असलेल्या डेरा नानक बाबामध्ये लगबग सुरू आहे. पांढऱ्या संगमरवराने बनवलेल्या गुरुद्वारामध्ये साफसफाईचे काम सुरू आहे. परदेशी भाविक आणि स्थानिक लोकांना भारताकडून जाणारा मार्ग बघून दु:ख वाटत आहे. काेराेनामुळे भारताने येथे येण्यासाठी भाविकांना बंदी घातली आहे. हे पवित्र तीर्थस्थळ अमृतसरपासून ४.७ किमी अंतरावर आहे. पाकिस्तान सरकारने १,७०० काेटी रुपये खर्च करून या गुरुद्वाराचा जीर्णाेद्धार केला आहे. भारताला जोडण्यासाठी १ किमी लांबीचा कॉरिडॉरही बनवण्यात आला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जाहिद हाफिज चौधरी म्हणाले, भारतीय यात्रेकरूंना पाठवण्याचा निर्णय भारत घेईल. आमच्याकडून कोणतेही निर्बंध नाहीत.

कर्तारपूर कॉरिडॉरच्या चारही बाजूंना शांतता आहे. गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यापूर्वी भाविकांना ५ चेक पॉइंट्स आेलांडावे लागतात. अधिकारी सर्व यात्रेकरूंच्या कागदपत्रांची कडक तपासणी केली जाते. प्रत्येक भाविकाला गुरुद्वारामध्ये जाण्यासाठी इलेक्ट्रॉनिक परवानगी कार्ड दिले जाते. गुरुद्वाराच्या आतल्या मोठ्या अंगणात तीन संगमरवरी इमारती आहेत. यापैकी एका इमारतीत बाबा गुरुनानक यांचे समाधिस्थळ आहे. उर्वरित दोन इमारतींत गुरुद्वारा आणि लंगरस्थळ आहे.

गुरुद्वारा जीर्णाेद्धाराचे २ टप्पे बाकी
गुरुद्वाराचे मुख्य ग्रंथी सरदार गाेविंदसिंह म्हणाले, हा जगातील पहिला गुरुद्वारा आहे. . एका वर्षात इम्रान सरकारने १,७०० काेटी रुपये खर्च करून जीर्णाेद्धार केला आहे. ही याेजना तीन टप्प्यांत हाेणार असून पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. दाेन टप्पे बाकी आहेत.

भाविक महिला म्हणाली- दाेन्ही देश चांगले शेजारी राहतील अशी प्रार्थना करते
काळ्या रंगाच्या पेहरावातील एक तरुणी गुरुद्वारामध्ये साकडे घालून परत येत आहे. तिचे नाव वीरपाल काैर आहे. ती भारतीय पंजाबी असून दुबईला राहते. भारत-पाकिस्तान संबंधांबाबत विचारले असता काैर म्हणाली, मला राजकीय विषयावर भाष्य करायचे नाही. परंतु एक दिवस दाेन्ही देश चांगल्या शेजाऱ्यासारखे राहतील अशी मी प्रार्थना करते. भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या बातम्या मी एेकत असते. अन्य देशांत दाेन्ही देशांचे लाेक मित्रासारखे राहतात.

कर्तारपूर साहिबवरून भारताने पाकिस्तानला फटकारले
संयुक्त राष्ट्रसंघ | भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला फटकारले आहे. या वेळी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या व्यासपीठावरून भारताने पाकिस्तानला लक्ष्य केले े. गेल्या वर्षी झालेल्या शांतता संस्कृतीच्या ठरावाचे पाकिस्तानने उल्लंघन केल्याचे भारताने म्हटले आहे. कर्तारपूर साहिब गुरुद्वाराचे व्यवस्थापन प्रशासकीय नियंंत्रण पाकिस्तानने शीख समुदायाच्या संस्थेकडून बिगर शीख संस्थेकडे दिले . पाकिस्तान अल्पसंख्याकविरोधी असल्याचे सांगत भारताने पाकिस्तानवर हल्ला केला आहे. . वास्तविक, पाकिस्तानने अलीकडेच कर्तारपूर गुरुद्वाराच्या समितीमधून तेथील मुस्लिमांकडे जबाबदारी सोपवली होती. तसेच ज्या संस्थेला ही जबाबदारी दिली तिला आयएसआयचा पूर्ण पाठिंबा आहे. या संस्थेत एकही शीख व्यक्ती नाही. या सभेच्या माध्यमातून गेल्या वर्षी पारित झालेल्या शांतता संस्कृती ठरावाचे पाकिस्तानने उल्लंघन केले असल्याचे भारताच्या स्थायी मिशनचे सचिव आशिष शर्मा यांनी संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७५ व्या सत्रात बाेलताना सांगितले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser