आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या नवरीला भेट म्हणून दिले गाढव:पाकच्या यूट्यूबरने पत्नीला गिफ्ट केले गाढवाचे पिल्लू; पाहा VIDEO

इस्लामाबाद4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

पाकिस्तानच्या एका यूट्यूबरने आपल्या नव्या नवरीला चक्क गाढव भेट म्हणून दिले. या यूट्यूबर महोदयाचे नाव अजलान शाह आहे, तर त्यांच्या 'शरीक ए हयात' अर्थात पत्नीचे नाव आहे वरीशा.

अजलान यांनी आपल्या नववधूला महागडी रिंग किंवा ज्वेलरी भेट म्हणून दिली नाही. त्यांनी तिला चक्क गाढवाचे पिल्लू भेट म्हणून दिले. विशेष गोष्ट म्हणजे या पिल्लाला एकटे वाटू नये म्हणून अजलान यांनी त्याची आईही सोबत आणली होती. अजलानच्या भेटीवर वरीशाने दिलेली प्रतिक्रिया तुम्हाला वरच्या फोटोवर क्लिक करून व्हिडिओत पाहता येईल.

अजलान व वरीशाने स्वतः हे छायाचित्र जारी केले आहे.
अजलान व वरीशाने स्वतः हे छायाचित्र जारी केले आहे.

जाणून घ्या नेमके प्रकरण?

 • अजलान शाह पाकिस्तानचे एक सुप्रसिद्ध यूट्यूबर आहेत. त्यांचे अनेक शॉर्ट व्हिडिओ व्हायरल झालेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा वरीशाशी निकाह झाला. निकाहानंतर दावत ए वलीमा झाला.
 • या वेडिंग रिसेप्शनमध्ये अजलानने आपल्या जीवनसाथी वरीशाला त्यांच्या आवडीचे गिफ्ट दिले. हे गिफ्ट म्हणजे प्रत्यक्ष गाढवाचे पिल्लू होते. अजलान व वरीशा हे दोघेही मुक्या प्राण्यांवर प्रेम करतात.
 • आता सोशल मीडियावर अनेकजण अजलानच्या या अनोख्या भेटीचे कौतुक करत आहेत. तर काहींना वरीशाला मिळालेले गिफ्ट अजिबात आवडले नाही. अजलान व वरीशा आनंदी आहेत. त्यांच्या रिसेप्शनमध्ये पाकच्या शो-बिज इंडस्ट्रीमधील अनेक विख्यात लोक सहभागी झाल्याचेही सांगण्यात येते.
बेबी डंकीसोबत पाकिस्तानी यूट्यूबर अजलान व त्यांची बेगम वरीशा.
बेबी डंकीसोबत पाकिस्तानी यूट्यूबर अजलान व त्यांची बेगम वरीशा.

अजलान व वरीशाच्या तोंडून गिफ्टची कहाणी

 • अजलानच्या गिफ्ट व वरीशाच्या रिएक्शनचा एक व्हिडोही उजेडात आला आहे. त्यात त्यांच्यात कोणती चर्चा झाली हे आम्ही तुम्हाला सांगू. अजलान रिसेप्शनमध्ये फिरत येतो. त्यानंतर म्हणतो...यार गिफ्ट कुठे आहे? हारिस प्लीज गिफ्ट घेऊन ये.
 • समोरून एक व्यक्ती दोरीला बांधून गाढवाचे पिल्लू घेऊन येतो. त्यावेळी वरीशा प्रथमच कॅमेऱ्यात दिसून येते. ती या पिल्लाच्या डोक्यावर हात फिरवून त्याच्यावर प्रेम करते.
 • अजलान त्यानंतर वरीशाला म्हणतो - आता प्रश्न हा आहे की गाढवच का? त्यावर वरीशा म्हणते - कारण मला हे आवडते. त्यानंतर अजलान म्हणतो - हा जगातील सर्वात कष्टाळू व प्रेमळ प्राणी आहे. मला प्राणी फार आवडतात. आता लोक काहीही म्हणाले तरी काही हरकत नाही. हे माझे स्पिरिट अॅनिमल आहे. प्लीज याची थट्टा उडवू नका.
 • त्यानंतर दोघेही बॉलिवूडच्या ‘एक मैं और एक तू, दोनों मिले इस तरह....’ गाण्यावर डान्स करतात. त्यानंतर आणखी एक बॉलीवुडचे गाणे ऐकू येते- मेरे महबूब मेरे सनम, शुक्रिया मेहरबानी करम...
वरीशा म्हणते - अजलानचे हे सरप्राइज गिफ्ट माझ्यासाठी बेनजीर म्हणजे अनमोल आहे.
वरीशा म्हणते - अजलानचे हे सरप्राइज गिफ्ट माझ्यासाठी बेनजीर म्हणजे अनमोल आहे.

आणखी काय म्हणतो अजलान

 • BBCशी बोलताना अजलान म्हणाला - लोक मला प्रश्न करतात की, मी वरीशाशीच लग्न का केले व गाढवच का गिफ्ट दिले? त्याचे उत्तर हे आहे की वरीशाही माझ्यासारखीच पशुप्रेमी आहे. माझ्या सवयी पाहून कदाचित दुसऱ्या एखाद्या मुलीने मला पसंत केले नसते. मी कधी सापांसोबत राहतो. तर कधी मगर किंवा पालींसोबत राहतो.
 • अजलान पुढे म्हणतो - वरीशाने एकदा मला सांगितले होते की, तिला गाढव खूप आवडते. माझ्या आईलाही गाढवांवर प्रेम आहे. एकेदिवशी मी धोबीघाटावर गेलो. तिथे 30 हजारांवर गाढवाचे हे पिल्लू खरेदी केले. आता त्यांना कष्ट करण्याची गरज नाही. ते माझ्या फॉर्महाऊसवर आराम राहून ऐश करतील.
 • गोष्ट पुढे सरकवताना शाह म्हणाले - हे आम्ही दत्तक घेतलेले मूल आहे. बेगमची त्याचे नाव माफिन ठेवण्याची इच्चा आहे. पण त्याला गुड्डू म्हणून बोलावेल. नाव थोडे देशी असले पाहिजे. पण नाव कोणते ठेवावे यावर माथापच्ची सुरू आहे.
आपल्या वेडिंग गिफ्टला जवळून न्याहाळताना नववधू दुल्हन वरीशा शाह.
आपल्या वेडिंग गिफ्टला जवळून न्याहाळताना नववधू दुल्हन वरीशा शाह.
बातम्या आणखी आहेत...