आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्लामाबाद:पाकचे सैन्य माझ्या अधिपत्याखाली : पंतप्रधान इम्रान खान

इस्लामाबाद7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानचे राजकारण व निवडणुकीत शक्तिशाली सैन्याच्या हस्तक्षेपाच्या आराेपाला पंतप्रधान इम्रान खान यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. लष्कर ही सरकारी संस्था आहे. ही संस्था माझ्या अखत्यारीत काम करते, असे इम्रान यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले.

एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्याकडे वास्तविक अधिकार नसल्याच्या आराेपांना फेटाळून लावले. ते सैन्याच्या इशाऱ्यावर चालणारे पंतप्रधान असल्याचा आराेपही त्यांनी नाकारला. पाकिस्तानात ११ विराेधी पक्षांची आघाडी असलेल्या पाकिस्तान डेमाेक्रॅटिक मूव्हमेंटने जाहीर सभांचा धडाका लावला आहे. सप्टेंबरपासून ही आघाडी अस्तित्वात आली आहे. या आघाडीने सैन्याच्या राजकीय हस्तक्षेपाचे जाेरदार आराेप केले. पाकिस्तानच्या सैन्यावर २०१८ मध्ये निवडणुकीत घाेटाळा करून कळसूत्री पंतप्रधान झाल्याचाही आराेप पीडीएमने केला आहे.

पाकिस्तानात दीर्घकाळ सैन्याचा प्रभाव असलेले सरकार राहिले आहे. त्याशिवाय लष्कराचा परराष्ट्र धाेरणावरही प्रभाव दिसताे. सैन्याने मात्र देशाच्या राजकारणात हस्तक्षेपाचा आराेप फेटाळला आहे. २०१८ च्या निवडणुकीत सैन्याने खान यांना विजयी करण्यासाठी मदतीचा आराेपही नाकारला. विराेधी पक्षाने साेमवारी लाहाेर जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली. त्यानुसार सैन्याने २०१८ च्या निवडणुकीत जनादेशावर प्रभाव टाकला व जनतेवर एक निष्क्रिय सरकार लादल्याचा ठपका ठेवला.

बातम्या आणखी आहेत...