आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाहोर:भारतीय कोहिनूरवर पाकिस्तानचा डोळा; लाहोर हायकोर्टात याचिका

लाहोरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सर्वात चर्चित हिऱ्यांपैकी एक कोहिनूरवर पाकिस्तानात दावा करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या लाहोर उच्च न्यायालयात मंगळवारी एक याचिका दाखल करून हा हिरा ब्रिटनमधून परत आणण्याची मागणी करण्यात आली. याचिकाकर्त्याने म्हटले आहे की, कोहिनूरला परत आणण्यासाठी सरकारने पावले उचलायला हवीत. याचिकाकर्त्याला १६ जुलैला आपले म्हणणे मांडण्याचे लाहोर उच्च न्यायालयाने सांगितले आहे.

याचिकाकर्ता वकील जावेद इक्बाल यांनी याचिकेत म्हटले आहे की, भारत कोहिनूर आणण्याचे प्रयत्न करत असल्याची माहिती त्याला मिळाली आहे. कोहिनूरला पाकिस्तानात परत आणण्यासाठी प्रयत्न वाढवण्याचे निर्देश सरकारला देण्याची मागणी त्यांनी उच्च न्यायालयात केली आहे. इक्बाल यांनी सांगितले की, ब्रिटनच्या लोकांनी पंजाबचे महाराज दलिपसिंग यांच्याकडून हा हिरा हिसकावला होता आणि त्याला आपल्यासोबत घेऊन गेले होते.

१०८ कॅरेटचा कोहिनूर हिरा : इक्बाल यांनी म्हटले आहे की, या हिऱ्यावर ब्रिटनच्या महाराणींचा कोणताही हक्क नाही आणि तो पंजाबच्या सांस्कृतिक वारशाचा भाग आहे.

जगातील सर्वात मोठ्या हिऱ्यांपैकी एक कोहिनूर हिरा परत आणण्यासाठी भारतही प्रयत्न करत आहेत. हा हिरा सध्या टॉवर ऑफ लंडनमध्ये ठेवलेल्या राजमुकुटात लावला आहे. हा हिरा सुमारे १०८ कॅरेटचा आहे.

भारतात सुप्रीम कोर्टातही याचिका दाखल झाली होती
कोहिनूर देशात परत आणण्याबाबत भारतातही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. तेव्हा केंद्र सरकारने म्हटले होते की, हिऱ्याला ब्रिटिश ना जबरदस्तीने घेऊन गेले आणि त्याची चोरीही केली नाही, तर तो पंजाबच्या शासकांनी ईस्ट कंपनीला भेट म्हणून दिला होता. तो स्वातंत्र्यपूर्व काळ असल्याने तो पुरावशेष व कला संपदा अधिनियम १९७२ अंतर्गत येत नसल्याने हिरा आणण्यात अनेक कायदेशीर आणि तांत्रिक अडचणी आहेत.

बातम्या आणखी आहेत...