आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तालिबान पहिल्या पाहुण्यासाठी तयार:पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी आज काबूलला जाणार, अफगाणिस्तानत स्थिरतेसाठी लॉबिंगही सुरू केले

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालिबान आपल्या पहिल्या पाहुण्याच्या स्वागतासाठी तयार आहे. सर्व काही निश्चित वेळापत्रकानुसार झाले तर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी आज काबूलला पोहोचतील. टोलो न्यूजने याबाबत माहिती दिली आणि सांगितले की, कुरेशी यांचा काबूलमधील कार्यक्रम निश्चित झाला आहे. जर कुरेशी काबूलला पोहचले तर तालिबानच्या ताब्यात आल्यानंतर ते अफगाणिस्तानला भेट देणारे पहिले विदेशी नेते असतील.

पाकिस्तानने रशिया-जर्मनीसह 5 देशांशी चर्चा केली
राजकीय विश्लेषकांनी टोलो न्यूजला सांगितले की, कुरेशी काबूलला जाण्याचे एकमेव कारण म्हणजे नवीन अफगाणिस्तान सरकारमध्ये आपली भूमिका मांडणे. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या तालिबानी सरकारसाठी लॉबिंग सुरू केले आहे.

कुरेशी यांनी शनिवारी रशिया, जर्मनी, तुर्की, नेदरलँड, बेल्जियमच्या नेत्यांशी फोनवर चर्चा केली. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लेव्ह्रोव्ह यांच्याशी चर्चेदरम्यान कुरेशी यांनी यावर जोर दिला की अफगाणिस्तानमध्ये स्थिरता पाकिस्तान आणि संपूर्ण क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

कुरेशी या संभाषणात म्हणाले की, पाकिस्तान अफगाणिस्तानमधील शांतता प्रक्रियेला सातत्याने पाठिंबा देत आहे. या देशात स्थिरता आणि शांततेसाठी राजकीय तोडगा हा सर्वोत्तम मार्ग आहे.

पाकिस्तान सुरुवातीपासूनच तालिबानला पाठिंबा देत आहे
अफगाणिस्तानवर तालिबानचा ताबा झाल्यानंतर कुरेशी म्हणाले होते की, अफगाणिस्तानमध्ये अशरफ घनी सरकारने तालिबानच्या विरोधात सुरू केलेला प्रचार खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे. कुरेशी सांगतात की, तालिबानने सर्वांना माफ करण्याची घोषणा केली आहे तसेच ते मुलींचे शिक्षणही थांबवणार नाहीत. तालिबानने आतापर्यंत घेतलेल्या शांततापूर्ण पावलांचे आम्ही स्वागत करतो.

बातम्या आणखी आहेत...