आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्राउंड रिपोर्ट:पाकमध्ये बलात्कार प्रकरणात सर्वात मोठे सर्च ऑपरेशन सुरू, 45 हजार लोक रस्त्यावर उतरले, कायदे बदलाची मागणी

इस्लामाबाद / शाह जमाल8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इम्रान सरकारच्या कार्यकाळातील सर्वात मोठे विरोधी आंदोलन
  • गेल्या वर्षी पंजाबातून 12 हजार महिलांचे झाले होते अपहरण

पाकिस्तानात महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. लोक सरकारविरोधात घोषणाबाजी करत आहेत. आंदोलकांच्या हातात फलक आहेत. ‘बलात्काऱ्यांना भररस्त्यात फासावर लटकवा’ अशा घोषणा आहेत. काही दिवसांपासून लाहोर, पेशावर, कराची व इस्लामाबाद यासारख्या शहरांत ४५ हजार महिला-पुरुष, मुले रस्त्यांवर उतरून आंदोलने सुरू आहेत. यासंदर्भात माहिती अशी की, गेल्या ७ सप्टेंबर रोजी पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील महामार्गावर एका महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कारामुळे लोकांत संतापाची भावना दिसून येत आहे. स्थानिक पोलिसांनी पीडित महिलेला दोषी ठरवत तिने दुसऱ्या मार्गावरून यायला हवे होते अशी टिप्पणी केली. महिलांच्या अधिकारांच्या आंदोलनाबाबत सांगायचे झाल्यास हे पाकिस्तानाच्या इतिहासातील तिसरे व इम्रान सरकारच्या काळातील सर्वात मोठे आंदोलन आहे . पोलिस बलात्कारप्रकरणी सर्वात मोठे सर्च ऑपरेशन करत आहेत. या मोहिमेसाठी पोलिसांची २८ पथके स्थापन करण्यात आली आहेत. त्यांनी आरोपीच्या शोधार्थ ७ ठिकाणी छापेही टाकले. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींची ६ रेखाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. एका छायाचित्रात आरोपी आबिद अलीला टक्कल दाखवले आहे, तर कोठे मिशा लावलेल्या आहेत.

आता जनतेकडून बलात्काराच्या कायद्यात बदल करण्याची मागणी होत आहे. पोलिसांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करत आहेत. ह्यूमन राइट्स वॉच आशियाचे वरिष्ठ सदस्य सरूप एजाज यांनी सांगितले, पाक सरकारने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. पाकिस्तानात महिलांचा आदर ठेवण्याच्या नावाखाली तिच्यावर बलात्कार, हिंसाचार, मुलींना शाळेत पाठवण्यावरून धोका, तुरुंगात महिलांचे होत असलेले शोषण व कार्यस्थळी लैंगिक छळांच्या घटनांत वाढ होते आहे.

पाकिस्तानच्या मानवाधिकार मंत्री शिरीन मजारी यांनी भास्करला सांगितले, पोलिसांनी स्वत:ची जबाबदारी टाळून महिलेस दोष देणे खूप चुकीचे आहे. या प्रकरणास एक उदाहरण म्हणून पाहता येईल या दृष्टीने निर्णय घेतले पाहिजेत, असे पंतप्रधानांशी मी बोलले आहे. ही लाजिरवाणी घटना आहे, असे त्या म्हणाल्या.

आंदोलकांच्या या पाच मागण्या
- लैंगिक हिंसाचाराच्या एखाद्या प्रकरणात शरीरसंबंध आले नसतील तरीही अारोपीस कठोर शिक्षा द्यावी.
- पोलिसांची जबाबदारी निश्चित करावी. पोलिस, वकील व न्यायाधीशांना प्रशिक्षण द्यावे.
- पीडितेस व साक्षीदारांना कडेकोट सुरक्षा द्यावी. संबंधितास सर्वतोपरी कायदेशीर मदतही मिळावी.
- लैंगिक शोषणात अशास्त्रीय अशा कौमार्य चाचण्या समाप्त कराव्यात
- सार्वजनिक स्थळी महिलांची सुरक्षा वाढवण्यात यावी. त्यांना हिंडण्या- फिरण्यास स्वातंत्र्य देण्यात यावे.

बातम्या आणखी आहेत...