आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तालिबानचा परिणाम:पाकिस्तानचे आता इस्लामीकरणाचे स्वप्न; देशात शरियाची चर्चा, कट्टरवाद वाढतोय

इस्लामाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानात तालिबानच्या सत्तेला एक महिना पूर्ण झाला आहे. तालिबानचा कट्टरवाद आता सीमेपलिकडे पाकिस्तानातही वाढू लागल्याचे दिसते. मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांकडून पाकिस्तानातील जनतेचा अपेक्षाभंग होत आहे. पाकिस्तानात शरिया कायदा लागू करणे आणि तालिबानच्या धर्तीवर सरकार स्थापन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सोबतच पाकिस्तानातील काही लोक अफगाणिस्तानातील तालिबानी राजवट म्हणजे आध्यात्मिक वरदान वगैरे असल्याचाही प्रचार करू लागले आहेत. पाकिस्तानात समुदायाच्या राजकीय तसेच कट्टरवादी गटांनी दबदबा वाढवण्यास सुरूवात केली आहे. अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारला पाकिस्तानचा पाठिंबा आहे. त्यामुळेच पाकिस्तानात तालिबानच्या बाजूने जनता झुकत असल्यास ते स्वाभाविक असल्याचे तज्ज्ञांना वाटते.

पण ही दुधारी तलवार : पाकिस्तानचे सरकार व सैन्य तालिबानच्या सरकार स्थापनेमुळे भलेही उड्या मारत असले तरी पाकिस्तानसाठी अशा प्रकारचा पाठिंबा दुधारी तलवारीसारखा ठरू शकतो. तज्ञ अलम मेहसूद म्हणाले, तेहरिक-ए-तालिबानसारख्या बंदी असलेल्या संघटना आपली कक्षा उत्तर-पश्चिमेकडील भागात वाढवत आहेत. सामान्य नागरिकांवरील तेहरिकचे हल्ले वाढण्याची भीती आहे.

अफगाणिस्तानात तालिबानने पहिल्यांदा १९९६ पासून २००१ पर्यंत सत्ता गाजवली. या दरम्यान पाकिस्तानात जिहादी संघटना व इस्लामी कट्टरवाद्यांना हवा मिळाली. या संघटनांनी पाकिस्तानात शिया व इतर अल्पसंख्याक समुदायाला लक्ष्य केले. १९९९ मध्ये जनरल परवेझ मुशर्रफ यांनी नवाज शरीफ सरकारला पायउतार करून सत्तेवर वर्चस्व मिळवले. पाकिस्तानातील राजकीय तज्ञ एहसान राज म्हणाले, तालिबानला राजाश्रय व सुन्नी संघटनांच्या पाठिंब्यामुळे दोन समुदायांत तणाव वाढेल.

इम्रान यांच्याकडून लांगूलचालन
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी इस्लामी कट्टरवादाचे समर्थन केले आहे. अलीकडेच त्यांनी महिलांच्या कपड्यांबाबत अयोग्य विधान केले होते. महिलांच्या शोषणासाठी त्यांचे कपडे कारणीभूत ठरतात. सरकार पाकिस्तानच्या तालिबानीकरणाचे समर्थन करत आहे, ही अत्यंत दुर्देवी बाब आहे, असे मानवी हक्क आयोगाचे उपाध्यक्ष असद बट यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...