आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानात अलीकडेच चिनी नागरिकांवरील आत्मघाती हल्ल्यानंतर बलूच समुदायावर दडपशाही सुरू झाली आहे. बलूच लोकांचे सुरक्षा यंत्रणेद्वारे अपहरण केले जात आहे. काही दिवसांपूर्वी लाहोर पाेलिसांनी पंजाब विद्यापीठात छाप्याची कारवाई केली. वसतिगृहात राहणाऱ्या काही बलुच विद्यार्थ्यांचे अपहरण करण्यात आले. व्हाइस फाॅर बलूच मिसिंग पर्सन्स (व्हीबीएमपी) या मानवी हक्क संस्थेच्या म्हणण्यानुसार तीन दशकांत सहा हजारांहून जास्त लोकांचे अशाच प्रकारे अपहरण झाले आहे. त्यांच्याविषयी आतापर्यंत काहीही माहिती मिळू शकलेली नाही. २००९ पासून आतापर्यंत १४०० बलूच नागरिकांचे मृतदेह आढळून आल्याचा दावाही एनजीओ करते. सामाजिक कार्यकर्ते मामा कादिर म्हणाले, दोन वर्षांत २८७ बलूच नागरिकांचे अपहरण झाले आहे.
लोक बेपत्ता होण्यामागे पाकिस्तानी सैन्य, आयएसआय असल्याचा आरोप मानवी हक्क संघटना, पीडित कुटुंब व नातेवाइकांकडून केला जातो. यातून खरे तर बलुच समुदायात बंडाची भावना आणखी वाढू लागली आहे. बलूचिस्तान विद्यार्थी परिषदेेने दिलेल्या हाकेला लाहाेेर, कराची, फैसलाबाद, इस्लामाबादसह प्रमुख शहरांतील बलूच विद्यार्थ्यांनी साथ देत आंंदोलन सुरू केले आहे. ते रस्त्यावर उतरून निदर्शने करत असून बलूच िवद्यार्थ्यांच्या विरोधातील अभियान तत्काळ थांबवण्याची त्यांची मागणी आहे. संघटनेतील सदस्य जहीर बलुच म्हणाले, आमचा आत्मघाती किंवा दहशतवादी हल्ल्यांशी काहीही संबंध नाही. दडपशाहीच्या कारवाईमुळे हजारो विद्यार्थी ईदसाठी देखील आपल्या घरी जाऊ शकले नाहीत. सिंगापूरमधील आंतरराष्ट्रीय अभ्यास केंद्र एस. राजरत्नम स्कूलचे वरिष्ठ अध्यापक फॅलो पंतुची म्हणाले, अलीकडच्या महिला आत्मघाती हल्ल्याकडे पाहिल्यास बलूचमधील तीव्र विरोध लक्षात येतो.
अनेक महिन्यांपासून अपहृत विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी निदर्शने
कराची, क्वेटा, इस्लामाबाद, लाहोरमध्ये अनेक महिन्यांपासून अपहृत विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी बलूचचे विद्यार्थी निदर्शन करत आहेत. परंतु पाक सरकारकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. एका घटनेत क्वेटा येथे २४ वर्षीय शाहिद बलूच व परिवार झाेपेत असताना सुरक्षा दलाचे जवान घरी आले व त्यांनी शाहिदला बळजबरीने नेले.
अस्मिता नष्ट करण्याचे काम चीन करतोय, बलूचचा आरोप
बलूच लिबरेशन आर्मी (बीएलए) फुटीरवादी चळवळ राबवत आहे. परंतु ते चिनी नागरिकांना का लक्ष्य करत आहे? त्याची अनेक कारणे आहेत. पंजाबचे चीनमुळे नुकसान होत आहे. चीन चिथावणीखाेर असल्याचे बलुचच्या बंडखाेरांना वाटते. बलूचची संस्कृती, भाषा, आेळख व इतर मूल्ये नष्ट करण्यासाठी चिनी लोक जबाबदार असल्याचा आरोप बलुच समुदाय करतो. चीनची ६२ अब्ज डॉलरची सीपॅक योजनेवरील गुंतवणूक म्हणजे दमनकारी वसाहतवाद असल्याचे बलूच समुदायाची धारणा बनली आहे. योजनेच्या आडून चीन या प्रांतातील खनिज संपत्तीची लूट करत आहे. त्याशिवाय लोकसंख्ये रूप बदलण्याचे कामही चीनकडून केले जात आहे. सीपॅकच्या नावाखाली चीन आपल्या जमिनीवर ताबा मिळवत असल्याचा आरोप बलूच आंदोलक करतात. चिनी लोकांवरील बलूच हल्ल्यांच्या वाढत्या घटनांमुळे नवीन शाहबाज शरीफ सरकारवर संकट असल्याचे सांगितले जाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.