आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात दाखल अविश्वास प्रस्ताव फेटाळला जाणे आणि नॅशनल असेंब्ली विसर्जित केल्याप्रकरणी दाखल याचिकेवरील सुप्रीम कोर्टातील सुनावणी बुधवारी पुन्हा पुढे ढकलण्यात आली. तत्पूर्वी सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश उमर अता बंदियाल यांनी संसदेत मांडला गेलेला अविश्वास प्रस्ताव फेटाळला जाणे हे परदेशी कारस्थान असल्याची जी शंका उपस्थित केली जात आहे त्याबद्दल प्रश्न उपस्थित केले. याचे काही ठोस पुरावे आहेत का, अशी विचारणा त्यांनी वकिलांना केली.
सरकारी वकील बाबर अवान यांना विचारले, की परकीय कारस्थानाचे आतापर्यंत केवळ आरोप आहेत, कोणतेच तथ्य समोर आले नाही. याचे काही पुरावे आहेत का?कोर्टाने सरकारकडून राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीचा तपशील मागितला. त्यात परकीय कारस्थानाशी संबंधित चिठ्ठीवर चर्चा झाली होती. पंतप्रधान इम्रान खान यांनी याच चिठ्ठीच्या आधारे अविश्वास प्रस्ताव आणल्याचा विरोधकांवर आरोप केला होता. पाच न्यायाधीशांच्या पीठाने वकिलास विचारले की, त्या दिवशीच्या अजेंड्यात नसलेली आणि कोणत्याही तथ्यांशिवाय घोषणा करू शकतात, अशी व्यवस्था अध्यक्ष देऊ शकतील का? सरन्यायाधीश म्हणाले, हा घटनात्मक मुद्दा असून त्यावर निर्णय घ्यायचा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.