आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Pakistan's Tainted Government; Four Major Cases Against PM Shahbaz, Sharif Out On Bail, Money Laundering kidnapping Cases Against Ministers

राजकारण:पाकचे कलंकित सरकार; पंतप्रधान शाहबाज यांच्यावर चार मोठे खटले , जामिनावर शरीफ बाहेर, मंत्र्यांवर मनी लाँड्रिंग-अपहरणाचे खटले

मनी लाँड्रिंग-अपहरणाचे खटले2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानमधील शाहबाज शरीफ यांचे सरकार कलंकित ठरले आहे. खुद्द पंतप्रधान शाहबाज यांच्यावर घोटाळ्यांत अनेक आरोप आहेत. तसे तर शाहबाज स्वत:ला निर्दोष असल्याचा दावा करतात, परंतु एका फौजदारी प्रकरणात शाहबाज सध्या जामिनावर आहेत. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे सभापती राजा परवेज अशरफ यांच्यावर वीज प्रकल्पात लाच घेतल्याचा ठपका आहे. शाहबाज यांचे पुत्र व पंजाबचे मुख्यमंत्री हमजा शरीफ यांच्यावर गुन्हेगारी प्रकरणांतील आरोपांची मोठी यादीच आहे. हमजा व शाहबाज यांच्यावर भ्रष्टाचार व मनी लाँड्रिंगचेही खटले सुरू आहेत. पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांना २०१९ मध्ये अंमली पदार्थ प्रकरणात अटक झाली होती. सनाउल्लाह यांनी लाहोरच्या तुरुंगात सहा महिने काढले आहेत. शाहबाज यांच्या सरकारमधील नियोजनमंत्री अहसान इक्बाल यांच्यावर एका क्रीडा संकुल बांधकाम घोटाळ्यात हात असल्याचा आरोप आहे. त्यांना पुढे न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. अनेक मंत्रीदेखील जामिनावर आहेत.

शरीफ परिवाराच्या २३ मालमत्तांवर टाच
शाहबाज शरीफ यांच्यावर चार मोठे खटले प्रलंबित आहेत. आशियाना हाउसिंग योजनेशी संबंधित खटला सर्वात मोठा मानला जातो. २०१० च्या प्रकरणात आशियाना योजनेचा करार मोडण्यात आला. त्यामुळे १९ कोटी रुपयांचे नुकसान झाले. नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोने शाहबाज यांना दोषी ठरवले होते. दुसरा खटला बेकायदा उत्पन्नाशी संबंधित आहे. त्यांच्या परिवारातील सर्व सदस्यांकडील उत्पन्न अवैध असल्याचे आढळून आले आहे. शरीफ परिवाराच्या सुमारे २३ मालमत्तांवर टाच आली. तिसरे प्रकरण रमजान साखर कारखान्याशी संबंधित आहे. नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोच्या म्हणण्यानुसार शाहबाज पंजाब मुख्यमंत्री पदावर असताना चिन्नाओट जिल्ह्यात त्यांच्या मुलांनी साखर कारखान्यात वाटपात घोटाळा केला होता. शाहबाज व त्यांचे पुत्र हमजा यांच्यामुळे पाकिस्तानच्या सरकारी तिजोरीला २१ कोटी रुपयांचा फटका बसला होता. चौथे प्रकरण हुदाबिया पेपर मिलचे आहे. इशहार डार यांच्याकडून शाहबाज शरीफ यांच्या खात्यावर अब्जावधी रुपयांची रक्कम बेकायदा पद्धतीने जमा झाल्याचाही ठपका आहे. परंतु लाहोर उच्च न्यायालयाने नंतर या प्रकरणात शाहबाज शरीफ यांच्याविरोधातील अर्ज फेटाळला होता. विशेष म्हणजे शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्याच्या दिवशी त्यांना या प्रकरणात एका स्थानिक न्यायालयात हजर व्हायचे होते. इम्रान खान यांनी हुदायिबा पेपर घाेटाळ्यात शाहबाज यांचे नाव असल्याचा निवडणूक मुद्दा बनवला होता. शाहबाज यांना या प्रकरणात जामीन मिळालेला आहे.

पंतप्रधानांच्या सल्लागारांना अंमली पदार्थप्रकरणी अनेक महिने होती कैद
पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे विशेष सल्लागार हनीफ अब्बासी यांना अंमल पदार्थ प्रकरणात जुलै २०१८ मध्ये तुरुंगवास भोगावा लागला होता. अब्बासी यांना कनिष्ठ न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. उच्च न्यायालयाने २०१९ मध्ये अब्बासींची सुटका केली होती. इम्रान यांच्या पक्षाने अब्बासी यांच्या नियुक्तीला कोर्टात आव्हान दिले आहे.

खोटे खटले दाखल केल्याचे नेत्यांचे दावे, सत्तेपासून रोखणारा कायदा नाहीपाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाने वरिष्ठ वकील बुरहान लतीफ म्हणाले, कायद्यानुसार कोणावरही गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यास निवडणूक लढवण्यास मनाई करणारा कायदा अस्तित्वात नाही. त्याचा लाभ राजकीय पुढारी घेतात. खोटा खटला असल्याचा दावा ते करतात. तसे पाहिल्यास देशात सत्तेसाठी विरोधकांवर गुन्हे दाखल करण्याची परंपरा राहिली आहे.

बातम्या आणखी आहेत...