आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:महामारीने बदलला लग्नाचा ट्रेंड; आता ड्रेस आणि खरे दागिनेच नव्हे तर करवली अन् चक्क केकही भाड्याने देत आहेत कंपन्या!

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नासारख्या समारंभासाठी अनेक गोष्टी भाड्याने मिळतात. ड्रेस, दागिन्यांपासून महाग वाहने, हेलिकॉप्टरही लोक भाड्याने घेत आहेत. पण कोरोनाने ट्रेंड बदलला आहे. अमेरिकेत वेडिंग केक आणि ब्राइड्समेडही (करवली) आता भाड्याने मिळत आहे. कोरोनामुळे मोठ्या प्रमाणावर समारंभ शक्य नाही. तो करायचे ठरवले तरी खरेदीसाठी वेळ आणि पैसे नाहीत. वेडिंग इंडस्ट्रीने या सर्व समस्यांवर तोडगा काढला आहे. आता जवळपास प्रत्येक वस्तू भाड्याने मिळत आहे.

शनेल आणि गुचीसारखे ब्रँडही : हेर्मेस किंवा शनेलचे महाग ब्रेसलेट, गुचीच्या अंगठ्या किंवा टिफनी अँड कंपनीचा हिऱ्यांचा नेकलेस, हे सर्व खरे दागिने ‘स्विच’ ही रेंटल कंपनी भाड्याने देते. या दागिन्यांची किंमत ५० हजारांपासून लाखो रुपयांपर्यंत आहे. पण ‘स्विच’ फक्त २९०० रुपयांत (प्रति दागिना) ते एक महिन्यासाठी देते. अशाच प्रकारे ‘रेंट द रनवे’ सारख्या कंपन्यांकडून व्हिक्टोरिया बॅकहम आणि लुहिलियर ब्रँडचे वेडिंग गाऊन २.५ ते ९ हजार रुपयांत भाड्याने घेता येतात. त्याशिवाय वॅलचा (वधू घालत असलेला स्कार्फ) दर ११ हजार ते एक लाख रुपये एवढा आहे, पण फक्त २०% देऊन तो भाड्याने घेता येऊ शकतो. वॉर्डरोब ही कंपनी ५५ ते ६० हजारांचे ब्रँडेड बूट फक्त १८०० ते २२०० रुपयांत भाड्याने देते. ग्राहक ते चार दिवस घालू शकतात.

फक्त १५०० रु. त भव्यता : आयोजन स्थळ
सजवण्याचे काम आयोजक आणि केटरर करतात, पण घराजवळ किंवा विशेष ठिकाणी समारंभ असेल तर १६०० ते ४ हजार रुपये घेऊन इव्हेंट प्लॅनर भव्यता देतात.

मदतीसाठी सखीही : ‘पेड टू ब्राइड्समेड’ ही कंपनी ५५ हजार रुपयांत बॅकअप ब्राइड्समेडची व्यवस्था करते. ‘ब्राइड्समेड फॉर हायर’च्या संस्थापक जेन ग्लांट्झ यांनी गेल्या ७ वर्षांत १५० पेक्षा जास्त लग्नात मदत केली आहे. त्या दर तासासाठी १४,६०० रुपये घेतात.

केकमध्येही बचत : फक्त दाखवण्यासाठी केकही, सुरुवात १५ हजारांपासून
परदेशात लग्नात वेडिंग केकचे महत्त्व आहे. पेन्सिल्वेनियाच्या किंबर्ली आया आणि फ्लोरिडाच्या पुंटा गोर्डाने त्यातही खर्चात बचत करण्याचा तोडगा काढला आहे. त्यांच्या केकची सुरुवात १५ हजार रुपयांपासून होते. फन केक फक्त दाखवण्यासाठी (डिस्प्ले) असतो. तो स्टायरोफोमपासून तयार केला जातो. त्यावर साखरेची फुले लावली जातात. पण केकचा खालचा भागच खाण्यासाठी असतो. नवदांपत्य तोच कापतात. पाहुण्यांसाठी शीट केक वेगळा खरेदी करावा लागतो. अमेरिकेत वेडिंग केकची एक चकती सरासरी ५१० रुपयांत, तर फन केकची चकती सरासरी १५० रुपयांत पडते.

बातम्या आणखी आहेत...