आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयफोन बनवणाऱ्या कंपनीत कोविडच्या नावाखाली दहशत:चीनमध्ये अ‍ॅपल कंपनीत दीड महिना कैद कामगारांचे बंड, रक्षकांशी धुमश्चक्री!

झेंग्झाऊ8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • :

चीनमध्ये काेविडविषयीचे कडक निर्बंध आणि वेळेवर वेतन मिळत नसल्याने अ‍ॅपलच्या आयफाेन निर्मात्या कंपनीतील कामगार नाराज झाले असून बुधवारी त्यावरून भडका उडाला. फाॅक्सकाॅन टेक्नाॅलाॅजी समूहाच्या या प्रकल्पातील कामगारांनी सुरक्षा रक्षकांशी धक्काबुक्की केली. या संघर्षात अनेक कामगार जखमी झाले. गेल्या महिन्यात लाॅकडाऊनची सुरुवात झाल्यापासूनच झेंग्झाऊमध्ये तणाव वाढण्यास सुरुवात झाली हाेती. आयफाेन सिटी असी ओळख असलेल्या झेंग्झाऊमध्ये दाेन लाखांहून जास्त कर्मचारी लाॅकडाऊनमुळे एकटे पडले हाेते. त्यांची भाेजनाचीदेखील फारशी व्यवस्था हाेत नव्हती. उपचाराचीही साेय नव्हती. त्यापैकी अनेक जणांनी प्रकल्पातून गेल्या वर्षी पळ काढला हाेता. फाॅक्सकाॅन व स्थानिक सरकारने काही आठवड्यांपूर्वी चांगले वेतन आणि कामाचे आश्वासन देऊन त्यांची गळती थाेपवली हाेती. परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला हाेता. परंतु काेविड संसर्गात वाढ, त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका व्हिडिओमध्ये काही संतप्त कामगारांनी व्यवस्थापकांना घेराव घातल्याचे दिसते. अॅपलसाठी झेंग्झाऊ हा सर्वात महत्त्वाचा प्रकल्प आहे. पाचपैकी चार नव्या हँडसेटसह आयफाेन-१४ प्राेचीदेखील येथे निर्मिती हाेते. चीनवरील अवलंबित्व अॅपलसाठी धाेकादायक ठरू शकते. प्रीमियम आयफाेनचे शिपमेंट या महिन्यात कमी असेल, असे कंपनीने आधीच स्पष्ट केले हाेते.

काेविड निर्बंधांमध्ये हिंसाचारात वाढ, शांघायमध्येही संघर्ष मे महिन्यात शांघायच्या क्वाँटा कॉम्प्युटरच्या कारखान्यात कामगार व सुरक्षा रक्षक यांच्यात धुमश्चक्री झाली हाेती. बाह्य जगाशी या कामगारांचा काहीही संपर्क राहिलेला नव्हता. त्यामुळे कामगारांमध्ये असंताेष धुमसत हाेता. दक्षिण चीनचे मॅन्युफॅक्चरिंग हब असलेल्या ग्वांगडाँगच्या लाॅकडाऊन असलेल्या भागातही निदर्शने झाली हाेती.

झीराे काेविड धाेरणाचा विपरीत परिणाम चीन सरकारने काेविड येताच घाईत लाॅकडाऊन लावण्यासाठी झीराे काेविड धाेरण लागू केले. अर्थव्यवस्थेला फटका बसला. फाॅक्सकाॅनच्या घटनेमुळे आदेशाचे परिणाम दिसून आले. त्यामुळे लोकांत संताप आहे.

धरपकड, धमकावून दमन निगराणी 74% राज्य हिंसाचार 60% अटक 48% हिंसाचार 15% हकालपट्टी 12% सेन्सॉरशिप 8% धमक्या 7%

कोरोना निर्बंधांमुळे मागणीत झाली घट चीनमध्ये काेविडच्या निर्बंधाचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर पडत असल्याचे दिसते. ग्राहक पुन्हा सक्रिय हाेत नसल्याचे दिसते. त्यामुळे एकूणच मागणीत घट झाली आहे. बाजारपेठेत मरगळ दिसून येते.

बातम्या आणखी आहेत...