आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Panjshir Amrullah Saleh | Afghanistan Panjshir Valley Taliban Crisis Latest; News About Taliban And Amrullah Saleh; News And Live Updates

तालिबानची भीती:तालिबानने काबूल ताब्यात घेण्यापूर्वी बंडखोर नेते सालेह यांनी जाळले पत्नी आणि मुलींचे फोटो

काबूल10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पळून जाणाऱ्या नेत्यांनी देशाचा विश्वासघात केला - सालेह

तालिबानने पंजशीरवर पूर्णपणे ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. अफगाणिस्तानच्या वृत्तानुसार, पंजशीरमधील बंडखोर नेत्यांचे प्रमुख अमरुल्ला सालेह ताजिकिस्तानला पळून गेले असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे एका दिवसाआधीच सालेह यांनी मला तालिबानला शरण जायचे नाही असे एका ब्रिटिश वृत्तापत्रातील लेखात म्हटले होते. यासोबतच तालिबानमुळे आपल्या कुटुंबाबद्दलची भीतीही व्यक्त केली होती. धक्कादायक बाब म्हणजे तालिबानने काबूलवर ताबा घेण्यापूर्वी सालेह यांनी आपल्या पत्नी आणि मुलींचे फोटो जाळले होते. यामुळे तालिबानची अफगाणिस्तानात किती दहशत आहे हे दिसून येईल.

जखमी झालो तर माझ्या डोक्यात 2 गोळ्या झाडा
सालेह यांनी सांगितले की, तालिबानने काबूलवर ताबा घेण्यापूर्वी मी काबूलमधील माझ्या घरी गेलो. दरम्यान, घरातील पत्नी आणि मुलींचे फोटो जाळले. यासोबतच माझ्या संगणकाची सारवासारव केली. यावेळी मी माझ्या मुख्य रक्षकाला कुराणवर हात ठेवण्यास सांगितले आणि म्हटले की, मी पंजशीर जात आहे आणि रस्त्यावर तालिबानचा ताबा आहे. आपण लढणार आहोत आणि शेवटपर्यंत सोबत लढू. लढाईदरम्यान, मी जर जखमी झालो तर माझ्या डोक्यात 2 गोळ्या झाडा. परंतु, मला तालिबान समोर झुकायचे नाही असा सक्त आदेश सालेह यांनी आपल्या मुख्य रक्षकाला दिला होता.

तालिबानने पंजशीर ताब्यात घेताच पहिले फोटो जारी केले. आता संपूर्ण अफगाणिस्तान ताब्यात असल्याचा दावा केला आहे.
तालिबानने पंजशीर ताब्यात घेताच पहिले फोटो जारी केले. आता संपूर्ण अफगाणिस्तान ताब्यात असल्याचा दावा केला आहे.

पळून जाणाऱ्या नेत्यांनी देशाचा विश्वासघात केला - सालेह
सालेह यांनी पुढे म्हटले की, तालिबानने काबूल ताब्यात घेण्यापूर्वी गुप्तचर प्रमुख माझ्याकडे आले. तुम्ही जिथेही जाल तेथे मी तुमच्यासोबत येईल. तालिबान्यांनी मार्ग अडवला तरी आपण एकत्र शेवटपर्यंत लढू असा विश्वास गुप्तचर प्रमुखांनी दिला असल्याचे ते म्हणाले. पळून जाणाऱ्या नेत्यांनी देशासोबत विश्वासघात केला आहे, ते आता गरीब अफघाणी लोकांना बंड करुन उठायला सांगत आहे. हा किती भ्याडपणा! जर बंडच करायचे असेल तर आपण त्या बंडाचे नेतृत्व करायले हवे असे सालेह पळून जाणाऱ्या नेत्यांवर टीका करताना म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...