आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काबूल:पंजशीरचे तालिबानींना आव्हान ‘या, तुम्हाला नरकात पोहोचवू’, आता थेट समोरासमोरचे युद्ध

काबूल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालिबानने आतापर्यंत आपल्या टप्प्यात न आलेला एकमेव प्रांत पंजशीरला घेरण्यास सुरुवात केली आहे. तालिबान प्रवक्त्यानुसार, उत्तर अफगाणिस्तानच्या जिल्ह्यांत लष्कराला शरण आणणारा कारीफैशुद्दीन तालिबानींना घेऊन पंजशीर खोऱ्याकडे निघाला आहे. दुसरीकडे, तालिबानविरोधी गटांचे नेतृत्व करणारा अहमद मसूद म्हणाला की, आम्ही वाटाघाटीतून तोडगा प्रयत्न करत आहोत. तरीही तालिबान पुढे जात असेल सरकत असेल तर आम्ही त्यांच्याशी लढू. उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेहही येथेच आहेत. त्यांच्याशी संबंधित सैन्य कमांडरने सांगितले की, पंजशीर खोरे स्वर्ग आहे.

तालिबान येथे राहण्याच्या लायकीचे नाही. आम्ही त्यांना आव्हान देतो की, खोऱ्यात घुसून तर पाहा, आम्ही त्यांना नरकात पोहोचवू. स्थानिक वृत्तानुसार, तालिबानने खोऱ्यात घुसण्याचा प्रयत्न केला होता, मात्र बंडखोर गटाने त्यांना घेरले. दोन्ही बाजूने मारलेल्या सैन्याचा दावा केला जात आहे. ३०० हून जास्त ठार झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्यास दुजोरा मिळाला नाही.

तालिबानची धमकी... ३१ ऑगस्टपर्यंत लष्कर बाहेर काढा, अन्यथा परिणाम भाेगा
लोकांना बाहेर काढण्यात थोडा वेळ लागेल, असे अमेरिकेने म्हटले आहे. सोमवारी तालिबानच्या धमकीनंतरही अमेरिकींना काही झाल्यास तालिबाननेही परिणाम भोगण्यास तयार राहावे, असा इशारा अमेरिकेने दिला आहे.

- तालिबानच्या प्रवक्त्याने सोमवारी स्पष्ट केले की, अमेरिका व इतर देशांचे लष्कर येथून गेल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये नवीन सरकारची स्थापना करण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...