आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापूजा-साहित्याचे दुकानदार रेमंड शिएह यांच्या लसीच्या किटमध्ये हिरवी, निळी व लाल रंगाचे व्हायल व एक माेठी सिरिंज आहे. ही सामग्री सुगंधित कागदापासून तयार करण्यात आली आहे. मृतांना समर्पित करण्यासाठी किटचे दहन केले जाणार आहे. जिवंत असताना त्यांना लस घेण्याची तीव्र इच्छा हाेती. त्यांची अंतिम इच्छा म्हणून त्यांना काेविड-१९ ची लस भेट दिली जात आहे. व्हायलचा रंग मलेशियात वापरल्या जाणाऱ्या तीन लसींचे प्रतिनिधित्व करणारा आहे. फायझर, अॅस्ट्राझेनेका व सिनाेव्हॅकसाठी प्रत्येकी वेगळा रंग प्रतिनिधित्व करताे. मलेशियात गेल्या महिन्यात दरराेज सुमारे वीस हजार नवे रुग्ण आढळले हाेते. देशातील निम्म्या लाेकसंख्येने लस घेतली आहे. परंतु काेराेना विषाणूमुळे हाेणारा मृत्युदर दक्षिण-पूर्व आशियात सर्वाधिक आहे.
दक्षिणेकडील जाेहाेर प्रांतात प्रार्थना व पूजा साहित्याचे दुकान चालवणारे शिएह म्हणाले, हे वर्ष मलेशियातील लाेकांसाठी अतिशय कठीण ठरले. अनेक लाेकांचा मृत्यू लसीच्या प्रतीक्षेत झाला. मलेशिया, सिंगापूर, तैवान व हाँगकाँगहून लस किटच्या ३०० ऑर्डर मिळाल्या आहेत. हे किट ग्राहकांना मानसिक शांती देऊ शकते. ताआेवादसारख्या चिनी धर्माचे अनुयायी सुगंधित कागद व कागदापासून बनवलेल्या वस्तूंचे दहन करून मृत्यू पावलेल्या प्रियजनांची अपूर्ण इच्छा पूर्ण करत आहेत. आत्मा नरकाच्या दहा न्यायालयांतून मार्गक्रमण करताे, असे अनुयायी मानतात. अंत्यसंस्काराचे हे विधी त्यांचा हा प्रवास सुकर करतात. त्यांचा त्रास कमी हाेताे. अनेक देशांत काेरोनाच्या संसर्गानंतर लसीसाठी लोकांना प्रतीक्षा करावी लागली.
आत्म्यांचे स्मरण करण्याचा उत्सव आता ऑनलाइन
दरवर्षी ऑगस्ट किंवा सप्टेंबरमधील उत्सवात लाेक पूर्वज व दिवंगत आत्म्यांचे स्मरण करतात. या काळात नरकाची दारे उघडली जातात. कागदी भेटवस्तूंचे दहन करतानाच अन्नही दान केले जाते. महामारीपूर्वी आत्म्यांना आनंदी करण्यासाठी चिनी ऑपेरा, नृत्याचे कार्यक्रम आयाेजित केले जातात. माेठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे आयाेजन केले जाते. आता हे कार्यक्रम ऑनलाइन हाेतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.