आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआई-वडिलांसाठी मुलांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपासून दूर ठेवणे अशक्य आहे. विशेषत: टीनेजर्ससाठी सोशल मीडिया त्यांच्या मित्रांशी जोडण्यासाठी आयुष्याचा अभिन्न भाग बनला आहे. एका संशोधनात ७१% मुलांनी मान्य केले की, सोशल मीडिया त्यांचे कौशल्य आणि कला दाखवण्याचा मंच देतो. सेटेटिस्टा डॉट काॅमचा अहवाल २०२१ नुसार, भारतात ३१% किशोर सोशल मीडियाचा वापर करत आहेत. अशा स्थितीत मुलांना सोशल मीडियाचा योग्य वापर शिकवला पाहिजे.
मुलांना सोशल मीडियाचा वापर कसा शिकवावा? किंवा कोणत्या गोष्टींबाबत सतर्क राहिले पाहिजे. यासाठी अमेरिकी लेखक एरिन यासाठी अमेरिकी लेखक एरिन हॅन यंानी काही पद्धती सांगितल्या आहेत. हे आपणही लक्षात घेतले पाहिजे. प्रथम तुमच्या मुलांचे किती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खाती आहेत याची माहिती ठेवा. यासाठी प्रथम तुम्ही तुमच्या मुलांशी चर्चा करा. तरीही मुलगा/मुलगी मोकळे बोलत नसेल तर त्याचा लॅपटॉप, टॅब्लेट किंवा स्मार्टफोनला पॅरेंटिंग कंट्रोल अॅपशी लिंक करा. यामुळे मुले नवे,जुने अॅप तुमच्या परवानगीशिवाय वापर करू शकणार नाहीत. यामध्ये मुलाचा स्क्रीन टाइमही सेट करू शकता.
दुसऱ्या मुलांना आपली वैयक्तिक माहिती अकाउंटवर टाकण्यापासूर रोखा. यासोबत हेही समजून सांगा की, कोणत्याही रँडम सर्व्हे किंवा प्रश्नमंजुषेत भाग घेणे योग्य नाही.
यूट्यूब आणि स्नॅपचॅटमध्ये मिळते सेफ्टी फीचर
९०% मुले यू-ट्यूब, ६७% टिकटॉक, ६५% इन्स्टाग्राम आणि ५९% स्नॅपचॅटचा वापर करतात. फेसबुक व टि्वटर मुलांमध्ये प्रायव्हसी सेटिंग खूप अद्ययावत आहे. उदा. यूट्यूबमध्ये स्वत:चा पॅरेंट कंट्रोल आहे. स्नॅपचॅट स्टोरीचा स्क्रीनशॉट घेण्याचा प्रयत्न केल्यास ते सूचना देते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.