आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वार्थी कारणासाठी पालकांची कडक वागणूक:पालक म्हणतात, खाेटे कधी बोलू नये;  पण मुले त्यांच्याकडून खोटे शिकतात!

लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

खाेटे कधी बाेलू नये, असे पालक आपल्या मुलांना नेहमी शिकवतात. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. आता मुले आई-वडिलांचे बघून खाेटे अधिक स्मार्ट पद्धतीने कसे बाेलावे हे शिकत आहेत. तेदेखील आपल्या पालकांना आवडावे म्हणून. अशा प्रकारे खाेटे बाेलल्यामुळे त्यांना पालकांकडून रिवॉर्डही मिळते.

उदाहणार्थ- मुले आपल्या आई-वडिलांचे वर्तन पाहून म्हणतात- मला तुमची टाेपी फार चांगली वाटत नाही. अशी प्रतिक्रिया दिल्यावर पालक त्यांच्याशी कठाेर वागतील याची त्यांना कल्पना असते. त्यामुळे ते खरे सांगण्याएेवजी मला वाटते, तुमच्या टाेपीचा रंग चांगला आहे. असे म्हटल्यानंतर पालकांना वाईट वाटणार नाही. अशा प्रकारे लहानपणापासून मुले आई-वडिलांसाेबत छाेट्या-छाेट्या गाेष्टींत खाेटे कसे बाेलायचे हे शिकू लागली आहेत. पूर्वी खोटे बोलल्याचे दिसल्यास आई-वडील मुलांना धपाटे द्यायचे. त्याचा धाक वाटत असत.

खोटे बोलल्याने धपाटे खाण्याची जोखीम घटते म्हणून.. मुले विसंगतीच्या गाेष्टी समजू शकतात. बहुतांश मुलांना खाेटे बाेलायचे स्पष्टपणे शिकवले जात नाही, परंतु सत्य गाेष्ट माेडताेड करून वापरल्यास धपाटे खाण्याची जाेखीम कमी असते हे मुलांना पालकांकडून शिकायला मिळते.

बातम्या आणखी आहेत...