आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Parents Who Use Mobile For 4 Hours A Day Get Irritated; 75% Have Depression, Children Are Also More Angry

संशोधन:दिवसातून 4 तास मोबाइल वापरणारे पालक चिडचिडे होतात; 75% जणांना डिप्रेशन, मुलांनाही जास्त रागावतात

ओटावा14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोबाइल फोन आणि अन्य डिजिटल उपकरणांचा दिवसातून ४ तास वापर करणाऱ्या पालकांच्या आपल्या मुलांसोबतच्या वागण्यात बदल झाला आहे. वॉटरलू विद्यापीठाच्या संशोधकांनी ५ ते १८ वर्षे वयोगटातील दोन मुले असलेल्या ५४९ पालकांचा सर्व्हे केला.

जे पालक फावल्या वेळेत किंवा आरामाच्या वेळी फोन किंवा अन्य डिजिटल माध्यमांच्या संपर्कात राहतात ते आपल्या मुलांबाबत चिडचिडे होतात. छोट्या-छोट्या गोष्टींवरून चिडतात व ओरडतात, असे या संशोधनातून समोर आले. मोबाइल फोन आणि अन्य डिजिटल उपकरणांचा वापर करणाऱ्या पालकांमध्ये ७५ टक्के डिप्रेशनही होते. हे संशोधन कोरोनाकाळात झाले. यात स्क्रीन टाइम आणि डिजिटल माध्यमांचा वापर वाढल्याचे यात आढ‌ळले. पालक दिवसातून सरासरी ३ ते ४ तास डिजिटल माध्यमांचा वापर करतात. वॉटरलू विद्यापीठातील क्लिनिकल सायकोलॉजीच्या स्कॉलर आणि या संशोधनाच्या लेखिका जॅस्मिन झांग म्हणाल्या, कुटुंब म्हणून पालक आणि मुले दोघांचे वर्तन महत्त्वाचे ठरते. अशा वेळी पालकांच्या वर्तनावरही नकारात्मक परिणाम होत असल्याचे आढळले. डिजिटल उपकरणांमुळे वाढलेला स्क्रीन टाइम व त्यांच्या वर्तनातील बदलात कनेक्शन दिसले. तसेच कुटुंबातील लोकांमध्ये बोलणे कमी झाले तेव्हा पालकांतील पालकत्वाशी संबंधित चुकीच्या सवयी समोर आल्याचे दिसले.

सोशल मीडियावर कमी व सामाजिकदृष्ट्या अॅक्टिव्ह राहासंशोधन प्रमुख प्रा. जॅस्मिन झांग सांगतात, जे पालक सोशल मीडियावर दिवसभरात १ किंवा २ तास घालवतात त्यांचे मुलांबद्दलचे वर्तन जास्त सकारात्मक राहते. त्या म्हणाल्या, पालकांनी सामाजिकदृष्ट्या अधिक अॅक्टिव असावेत.

बातम्या आणखी आहेत...