आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Parrot Stole Journalist's Earphone VIDEO | While Reporting The Theft, The Parrot Flew Away With The Earphone | Marathi News

पोपटाने चोरला पत्रकाराचा इअरफोन, VIDEO:चोरीची रिपोर्टींग करत होता, इअरफोन घेऊन उडून गेला पोपट

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण अमेरिकन देश चिलीमध्ये एका पोपटाने एका पत्रकाराचा एअरफोन चोरला. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नेटिझन्समध्ये खूप शेअर केला जात आहे. या घटनेची गमितशीर गोष्ट म्हणजे पत्रकार एका शहरातील चोरीच्या घटनेचे वार्तांकन करत होते. तेवढ्यात पोपटाने त्याचा इअरफोन चोरला.

पत्रकार निकोलस क्रुमचा हा व्हिडिओ जीन हॅल्हेड नावाच्या महिलेने शेअर केला आहे. निकोल्स एका शहरात झालेल्या चोरीची लाईव्ह रिपोर्टींग करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. तेवढ्यात एक पोपट येऊन त्यांच्या खांद्यावर बसतो. 10 सेकंद बसल्यानंतर पोपट त्यांचा इअरफोन घेऊन उडून जातो. काही रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की, पोपटाने काही अंतरावर इअरफोन टाकला, जो रिपोर्टरला सापडला आहे.

अँकरच्या तोंडात गेली माशी
रिपोर्टिंग दरम्यान घडलेली ही पहिली मजेदार घटना नाही. यापूर्वीही अशा काही घटना घडल्या आहेत. सप्टेंबर २०२२ मध्ये कॅनडामध्ये अँकरिंग करताना एका महिला पत्रकाराच्या तोंडात माशी आली होती. ग्लोबल न्यूज चॅनलची अँकर फराह नसीरसोबत ही घटना घडली आहे. बातमी वाचताना हवेत उडणारी माशी तिने गिळली होती.

कुत्र्याने महिला रिपोर्टरचा माईक हिसकावून घेतला
एप्रिलमध्ये मॉस्कोमध्ये थेट प्रक्षेपण सुरू असताना एका कुत्र्याने एका रिपोर्टरचा माईक हिसकावून घेतला होता. रिपोर्टर हवामानाचा अहवाल देत होता. त्यानंतर एका कुत्र्याने उडी मारून रिपोर्टरच्या हातातील माईक हिसकावून घेतला.

पाकिस्तानी महिला पत्रकाराने मुलाला चापट मारली
पाकिस्तानातील एका महिला पत्रकाराने ईदच्या मुहूर्तावर वार्तांकन करताना कॅमेऱ्यासमोर दिसल्याने एका मुलाला चापट मारली. मुलगा रिपोर्टरला त्रास देत होता, त्यामुळे तिचा राग अनावर झाला आणि त्याला चापट मारली.

बातम्या आणखी आहेत...