आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Participating In A Beauty Pageant Without Makeup; Miss England Pageant, Natural Beauty Good : Melissa | Marathi News

दिव्य मराठी विशेष:मेकअपविनाच सौंदर्य स्पर्धेत सहभागी ; मिस इंग्लंड स्पर्धा, नैसर्गिक सौंदर्य चांगले : मेलिसा

लंडन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेकअप व महिला यांचे अतूट नाते आहे. एखाद्या तरुणीने साैंदर्य स्पर्धेत मेकअपविना उतरण्याची कल्पनादेखील करता येत नाही. परंतु असे पाहायला मिळाले. इंग्लंडमध्ये मेलिसा राैफ मिस इंग्लंड स्पर्धेत विनामेकअप सहभागी झाली. ९४ वर्षांची परंपरा असलेल्या या साैंदर्य स्पर्धेत एखादी साैंदर्यवती विनामेकअप सहभागी हाेण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये वीसवर्षीय मेलिसा दाखल झाली आहे. मेलिसाने आपल्या कृतीतून केवळ नैसर्गिक साैंदर्यावर भर दिला असे नाही तर अंतिम फेरीतही प्रवेश करून दाखवला. आता ती १७ ऑक्टाेबरला अंतिम फेरीत इतर ४० महिलांसाेबत स्पर्धेच्या मुकुटासाठी आपला दावा करेल.

मेलिसा कधीही मेकअप करत नाही असे मुळीच नाही. कारण पूर्वी तीदेखील मेकअप करायची. परंतु साैंदर्य स्पर्धेत सहभागी हाेण्याचे ठरवल्यानंतर तिने मेकअप साेडला. जगातील साैंदर्याच्या मापदंडावर मी याेग्य ठरते, असे मला कधीही वाटले नाही. परंतु मी स्वत:ला जसे आहे तसे स्वीकारणे शिकले आहे. मी मनात स्वत: सुंदर असल्याचा अनुभव घेते. म्हणूनच मी साैंदर्य स्पर्धेत विनामेकअप उतरण्याचा निर्णय घेतला, असे मेलिसाने सांगितले.लंडनची रहिवासी असलेली मेलिसा राैफ राज्यशास्त्राची विद्यार्थिनी आहे. अंतिम फेरीत पाेहाेचण्याला नक्कीच अर्थ आहे. मिस इंग्लंड स्पर्धेच्या संचालिका अँजी बिस्ले म्हणाल्या, सामान्यपणे अशा स्पर्धेसाठी स्पर्धक खूप मेकअप केलेले संपादित फाेटाे पाठवतात. परंतु आम्हालादेखील या मुखवट्यामागील मानवी चेहरा पाहायचा असताे. त्यामुळे २०१९ मध्ये स्पर्धेत एक वेगळी फेरी सुरू केली हाेती. एखाद्या स्पर्धकाने नैसर्गिक साैंदर्यासह सहभाग घेतल्याचे मी पहिल्यांदाच पाहिले आहे.

महिलांनी स्वत:ला स्वीकारले पाहिजे : मेलिसा
बहुतांश मुली सामाजिक दबावामुळे मेकअप करतात, असे मेलिसाने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. आपण आनंदी असू तर आपल्या चेहऱ्यासाठी मेकअपची गरज भासत नाही. खरे तर आपल्यात याबाबतीत असलेल्या उणिवा देखील आपल्याला विशेष बनवत असतात. त्यासाठी स्वत: ला आधी स्वीकारले पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...