आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेत लॉस एंजेलिसहून बोस्टनला जाणाऱ्या फ्लाइटमधील प्रवाशाने इमर्जन्सी गेट उघडण्याचा प्रयत्न केला. क्रू मेंबरने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने हल्ला केला. ही घटना रविवारची आहे. मॅसॅच्युसेट्सच्या या प्रवाशाला बोस्टन लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली. त्याला एअरलाइन्सच्या कोणत्याही फ्लाइटमधून प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
लँडिंगच्या 45 मिनिटे आधी क्रूला मिळाला अलर्ट
युनायटेड एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये, फ्रान्सिस्को सेवेरो टोरेस (33) यांनी लँडिंगच्या 45 मिनिटांपूर्वी फर्स्ट क्लास आणि कोच सेक्शनमधील इमर्जन्सी गेट उघडण्याचा प्रयत्न केला. यामुळे क्रूला कॉकपिटमध्ये अलर्ट मिळाला. यानंतर फ्लाइट अटेंडंट तपासणीसाठी इमर्जन्सी गेटजवळ पोहोचले. तेथे त्यांना दरवाजाचे हँडल पूर्णपणे बंद नसल्याचे दिसले, त्याची इमर्जन्सी स्लाइडही काढण्यात आली होती.
बोस्टन विमानतळावर संशयिताला अटक
टोरेसची चौकशी केल्यानंतर अटेंडंटने कॅप्टनला लवकरात लवकर विमान उतरवण्यास सांगितले. दरम्यान, टोरेसने अटेंडंटवर तुटलेल्या चमच्याने हल्ला केला. त्याने त्यांच्यावर मानेवर 3 वार केले. क्रू मेंबर्स आणि प्रवाशांच्या मदतीने टोरेसला नियंत्रणात आणण्यात आले. त्यानंतर फ्लाइट बोस्टन विमानतळावर सुरक्षितपणे उतरताच टोरेसला अटक करण्यात आली.
जन्मठेपेची होऊ शकते शिक्षा
फ्लाइटमधील प्रवाशांनी नोंदवले की टोरेस टेक ऑफ झाल्यापासून विचित्रपणे वागत होता. इमर्जन्सी गेटचे हँडल आणि सुरक्षेबाबत तो वारंवार विचारणा करत होता. तो अनेकदा इमर्जन्सी गेटजवळ फिरतानाही दिसला.
टोरेसला 9 मार्च रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आरोप सिद्ध झाल्यास त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. यासह 4 कोटींहून अधिक दंडही आकारला जाऊ शकतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.