आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Patients On The Brink Of Death Begin To Plead For Vaccine, Risk Increases As Vaccination Declines In Five US States

वाॅशिंग्टन:मृत्यूच्या उंबरठ्यावरील रुग्ण करू लागले लसीसाठी याचना, पाच अमेरिकन राज्यांत लसीकरण घटल्याने जाेखीम वाढली

वाॅशिंग्टन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत ६० टक्के वयस्करांचा लसीकरण कार्यक्रम पूर्ण झाला आहे. परंतु किमान पाच राज्यांत काेराेना लसीकरणात घट झाल्याने तिसऱ्या लाटेचा धाेका वाढला आहे. अल्बामा, आेकाहाेम, िमसाेरी, अरकनसास, लुसियाना, मिसिसीपीचा यात समावेश आहे. अल्बामामध्ये लसीकरणासाठी पात्र लाेकांपैकी केवळ ३३ टक्क्यांनी २० जुलैपर्यंत डाेस घेतला आहे. लुसियानामध्ये ३६ टक्के एवढे प्रमाण आहे. वास्तविक अमेरिकेत काेराेना डेल्टा व्हेरिएंटचे ८३ टक्के प्रमाण आढळून आलेले असताना देशातील काेराेनाची ही स्थिती आहे. अल्बामाममध्ये रुग्णालयात दाखल काेराेना रुग्ण लसीसाठी याचना करू लागले आहेत. येथील अनेक रुग्णांना लसीसाठी याचना करत प्राण साेडावे लागले आहेत.

अल्बामाच्या डाॅक्टर ब्रिटनी काेबिया म्हणाल्या, ग्रँडव्ह्यू मेडिकल सेंटरमध्ये काेराेनाची लस नसल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. या रुग्णांना याेग्यवेळी लस देता आली नाही. शेवटच्या दिवसांत या रुग्णांनी लसीसाठी याचना केली. आमचाही नाईलाज आहे. अशा रुग्णांचा हात पकडून मी म्हणते मला खेद वाटताे. पण आता खूप उशीर झाला. अशा लाेकांना वेळेवर काेराेनाचा डाेस मिळाला असता तर त्यांचे प्राण वाचले असते. पुढे परिस्थिती आणखी बिघडू शकते. म्हणूनच गंभीर संसर्ग असलेल्या तरुणांना रुग्णालयात दाखल करत आहाेत.

अल्बामामध्ये एप्रिलपासून आतापर्यंत काेराेनामुळे मृत्युमुखी पडलेल्या ९६ टक्के लाेकांनी लसीकरण केलेले नव्हते. राेग नियंत्रण व राेगप्रतिबंधक केंद्र (सीडीसी)यांच्या म्हणण्यानुसार काेराेना रुग्ण लस घेऊ शकतात. मात्र, काही रुग्णांना उपचारानुसार ९० दिवसांपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते.

अमेरिकेत आता लसीकरण न करण्याची महामारी : सीडीसी
सीडीसीचे संचालक रोशेल वॅलेन्स्की म्हणाले, अमेरिकेत आता लसीकरण न करण्याची महामारी सुरू झाली आहे. लोक डोस घेण्यासाठी पुढे येत नाहीत. अमेरिकेत आता दररोज ५,२१,००० डोस दिले जात आहेत, असे वॅलेन्स्की यांनी सांगितले. एप्रिलपासूनच्या दैनंदिन लसीकरणाच्या आकड्याहून ते ८५ टक्के कमी आहेत. तेव्हा ३ लाखांहून जास्त डोस दिले जात होते.

बातम्या आणखी आहेत...