आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्रिटन:पहिल्या स्वीकृत लसीबाबत 24 तासांत समस्या, अॅलर्जी असणाऱ्या रुग्णांनी फायझरची लस न घेण्याचा सल्ला

लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पहिल्या स्वीकृत लसीबाबत 24 तासांत समस्या, दाेन आराेग्य कर्मचारी आजारी

जगातील पहिली स्वीकृत लस जारी करणारा ब्रिटन मंगळवारी पहिला देश ठरला हाेता. स्वीकृतीच्या केवळ २४ तासांत त्याबद्दलची समस्या समाेर आली आहे. येथे लसीचे डाेस घेतलेले दाेन आराेग्य कर्मचारी आजारी पडले आहेत. आजारी कर्मचाऱ्यांची नावे मात्र अजून समाेर आलेली नाहीत. परंतु दाेघांनाही लसीमुळे रिअॅक्शन आली आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यानंतर आता ब्रिटनच्या हेल्थकेअर प्राॅडक्ट रेग्युलेटरी एजन्सीने एक सूचना जारी केली आहे. एखादी गाेष्ट खाल्ल्याने किंवा औषधीची अॅलर्जी असल्यास लसीचा डाेस घेऊ नये, असे नियामक संस्थेने स्पष्ट केले आहे.

अॅलर्जीची समस्या असलेल्या किती लाेकांना फायझरच्या लसीपासून राेखले जाणार आहे, हे मात्र स्पष्ट झालेले नाही. परंतु ही संख्या अंदाजे ७० लाखांवर जाते. अशा लाेकांना तज्ज्ञांद्वारे उपचार घ्यावे लागत आहेत. नवीन लसीमुळे अॅलर्जीचे काही रुग्ण आढळून येणे स्वाभाविक आहे, असे आराेग्यसेवा उपलब्ध करून देणाऱ्या एनएचएसला वाटते. लसीच्या डाेसमुळे शरीराच्या तापमानात चढ-उतार, उलटी इत्यादी साइड इफेक्ट हाेऊ शकतात.

अमेरिकेत तपासणीदरम्यान चार जणांना चेहऱ्याचा लकवा

अमेरिकेत फायझर लसीच्या परीक्षणादरम्यान चार जणांना चेहऱ्याचा लकवा (बेल्स पाल्सी) झाला हाेता. सामान्यपणे हा अस्थायी स्वरूपाचा असताे. त्यात चेहऱ्याच्या एका बाजूच्या मांसपेशी क्षीण हाेतात. नर्व्ह याेग्य पद्धतीने काम करत नसल्याने तसे हाेते. अमेरिकेत २१ हजार ७२० लाेकांवर त्याचे परीक्षण करण्यात आले हाेते. त्यापैकी चार जणांना बेल्स पाल्सी झाले हाेते.

चीनची लस ८६ टक्के प्रभावी असल्याचा यूएईचा दावा

चीनची लस ८६ टक्के प्रभावी असल्याचा दावा यूएईने बुधवारी केला. त्यावरून ही लस पश्चिमेकडील देशांनी विकसित केलेल्या लसीचा मुकाबला करण्यासाठी सक्षम आहे, हे लक्षात येते. ही लस चीनची कंपनी सायनाेफार्मने विकसित केली. ही लस गंभीर रुग्णांसाठी १०० टक्के उपयाेगी असल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्याशिवाय लसीकरणाचे गंभीर साइड इफेक्टदेखील नाहीत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser