आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकन नागरिकांच्या शॉपिंगच्या सवयी बदलल्या आहेत. लोक आता मॉल्स किंवा डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये जाण्याऐवजी ऑनलाइन खरेदीला प्राधान्य देतात. मॉल्समध्ये जाण्याऐवजी पसंतीच्या ठिकाणी सुटी घालवण्यासाठी जातात. लोकांच्या बदलत्या सवयींमुळे मॉल्स तसेच डिपार्टमेंटल स्टोअर्स ओस पडू लागली आहेत. परिणामी मॉल्स व डिपार्टमेंटल स्टोअरचा वापर इतर कामांसाठी केला जात आहे. काही मॉल्समध्ये शाळा सुरू झाल्या आहेत, तर काही ठिकाणी क्लिनिक सुरू झाले. काहींनी गांजाची शेती सुरू केली. बर्लिंग्टन हाय मॉल्समध्ये आता इयत्ता नववीतील दिव्यांग मुलांसाठी विशेष कोचिंग क्लास सुरू केले आहेत. अशाच प्रकारे ‘डाऊनटाऊन बीएचएस’ने विद्यार्थ्यांसाठी आपली दारे खुली केली आहेत. त्यामुळे मॅसीच्या डिपार्टमेंटल स्टोअरच्या परिसराला शाळेत रूपांतरित करण्यात आले आहे. काही शिक्षकांनी शिकवणीसाठी डिपार्टमेंटल स्टोअरची निवड केली आहे. काही मॉल्समध्ये कॅफेटेरिया, ग्रंथालय, संगीत-कला, शारीरिक शिक्षणाशी संबंधित व्यवहार केले जात आहेत. एका शाळेचे मुख्याध्यापक लाॅरेन मॅकब्राइड म्हणाले, येथे विद्यार्थी शिक्षणासाठी उत्सुक आहेत. संपूर्ण अमेरिकेत आता डिपार्टमेंटल स्टोअर किंवा मॉल्सचा इतर कामांसाठी वापर करण्यास सुरुवात झाली आहे. मॅसाच्युसेट्सच्या ईस्टफील्ड मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर भांगेचे उत्पादन करण्यास मंजुरी मिळाली.सिटाडेल मॉलमध्ये क्लिनिक सुरू झाले.
मॉल्स संचालकांना नवे दुकानदार मिळेनात
अॅनालिटिक्स फर्म ग्रीन स्ट्रीटच्या म्हणण्यानुसार अमेरिकेत १ हजाराहून जास्त ‘बी’ व ‘सी’ श्रेणी चे मॉल आहेत. विश्लेषक विन्स टिबाेन म्हणाले, कोरोनाच्या काळात बहुतांश मॉल डाऊनग्रेड करण्यात आले. कारण भाड्यांत कपात केली गेली. त्याशिवाय नवे दुकानदारही मिळत नाहीत.
उद्योजक ते लष्करी कमांडर बनलेले वसेवोलॉड कोझेम्याको युक्रेनमधील सर्वात मोठ्या अब्जाधीशांपैकी आहेत. युक्रेनमधील सर्वात मोठ्या धान्य उत्पादन, भांडार व निर्यात कंपन्यांपैकी असेल्या अॅग्रोट्रेड समुहाचे संस्थापक व सीईओ आहेत. परंतु आता त्यांनी सर्व लक्ष युद्धावर केंद्रित केले आहे. मी एक उद्योगपती आहे. परंतु युक्रेनमध्ये सध्या एका लष्करी तुकडीचा कमांडर आहे, असे सांगतात. वसेवोलॉद कोझेम्याको यांनी आपल्या लाइट इन्फेन्ट्री बटालियनची स्थापना केली व त्याचे ते नेतृत्व करतात. त्याला औपचारिकदृष्ट्या चार्टरच्या रुपाने पाहिले जाते. त्यात बहुतांश नागरिक असतात. त्याला अनौपचारिक भाषेत अब्जाधीशाची बटालियन असेही संबोधले जाते. इतर श्रीमंत युक्रेनी व्यक्तींसोबत कोझेम्याको प्रशिक्षण व शस्त्र-वाहनांचा खर्चही उचलतात. त्यांचे युनिट लष्कराकडून दिशा निर्देश घेतात. परंतु काम मात्र स्वतंत्रपणे केले जाते. ५२ वर्षीय कोझेम्याको मॅरेथॉन रनरही राहिले आहेत. २०१७ मध्ये न्यूयॉर्क सिटी मॅरेथॉन त्यांनी ३ तासांहून कमी वेळेत पूर्ण केली. त्यांना उंची कपडे, परदेशी भ्रमंती यांची आवड आहे. त्यांनी युद्धापूर्वी स्वित्झर्लंड, ऑस्ट्रियामध्ये स्की इन्फेन्ट्री व यॉटवर घालवलेल्या सुटीतील छायाचित्रे इन्स्टाग्रामवर दिसतात. कोझेम्याको यांना चार मुले आहेत. ते हजारो एकर शेतीचे मालक आहेत. ही शेती ते १५०० हून जास्त कर्मचाऱ्यांच्या मदतीने सांभाळतात. गेल्या १०० हून जास्त दिवसांपासून युद्ध सुरू आहे. रशियाचे खारकिव्हवर हल्ले सुरूच आहेत.
विशेष मार्शल लाॅअंतर्गत बटालियन वैध
बटालियन टेरिटोरियल डिफेन्स युनिट आहे. युद्धाची गरज संपेपर्यंत हे बटालियन सक्रिय राहू शकते. अशा अनेक युनिटमध्ये अनेक स्थानिक पुरूषांचे गट आहेत. ते वाळूने भरलेल्या पोत्यांचा आधार घेत रशियन सैन्यावर गोळीबार करतात. विशेष मार्शल लॉ अंतर्गत हे युनिट अधिकृत आहे.मॉल्समध्ये शाळा, क्लिनिक सुरू; गांजाची शेतीही !
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.