आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारतासह जगातील ८१ देशांमध्ये शांततेत वाढ झाली आहे. तर ८० देशांमध्ये शांततेत घट नोंदवण्यात आली आहे. ही माहिती इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पीसच्या ग्लोबल पीस इंडेक्स या अहवालातून समोर आली आहे. यानुसार, जगभरात शांततेत वाढ झाली आहे. मात्र, १२ वर्षांत ९ वेळा यात घट नोंदवण्यात आली आहे. अहवालात २३ निकषांनुसार, जगभरातील देशांमधील पातळी ठरवण्यात आली आहे. यात १६३ देशांमध्ये भारत १३९ व्या क्रमांकावर आहे. तसेच २०१९ मध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशात गदारोळ झाला नसता तर भारतातील स्थितीमध्ये सुधारणा असती. दुसरीकडे राजकीय, जातीय आणि धार्मिक समुदायांमधील तणाव देशाच्या शांततेला धक्का पोहोचवणारा असल्याचे यात नमूद केले आहे.
आइसलँड सलग ८ व्या वर्षी सर्वाधिक शांत
ग्लोबल पीस इंडेक्समध्ये आइसलँड सलग ८ व्या वर्षी सर्वात शांत देश ठरलेला आहे. पहिल्या ५ देशांत युरोपमधील ऑस्ट्रिया आहे.
> २०११-१८ दरम्यान युरोपमध्ये १६०० हून जास्त आंदोलन, हिंसा.
> यमन वगळता इतर चार देश २०१५ पासून खालच्या स्तरावर.
यूएनच्या शांतता प्रयत्नात भारताची भूमिका वाढली
अहवालात शांतता प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमध्ये भारताची भूमिका वाढल्याचे म्हटले आहे. तसेच जगभरात शस्त्र निर्मितीवर आणि सैन्यावर होणाऱ्या खर्चातील घट प्रशंसनीय असल्याचे यात नमूद केले आहे.
देश : स्कोअर
आइसलँड : 1.08
अफगाणिस्तान : 3.64
न्यूझीलंड : 1.19
सिरिया : 3.54
पोर्तुगाल : 1.25
इराक : 3.48
ऑस्ट्रिया : 1.27
दक्षिण सुदान : 3.44
डेन्मार्क : 1.28
यमन : 3.41
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.