आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:तैवानच्या राजधानीत पादचाऱ्यांना 770 चौकांत ट्रॅफिक लाइट लागल्यावर प्रतीक्षेची गरज नाही

तैपेई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तैवानची राजधानी तैपेईमध्ये आता पादचारी लोकांना ट्रॅफिक लाइट लागल्यावर उशिरापर्यंत प्रतीक्षा करत बसण्याची गरज भासणार नाही. वाढत्या उन्हामुळे पायी चालणाऱ्या नागरिकांना ट्रॅफिक लाइट लागल्यावरचा प्रतीक्षेचा कालावधी दीड मिनिटाहून कमी करण्यात आला आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने त्यामुळे नागरिक हाेरपळू नयेत म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी घाेषणा झाल्यानंतर राजधानी तैपेईमध्ये सुमारे ७७० चाैकांत हा नियम लागू करण्यात आला आहे. प्रत्येक चाैकात प्रतीक्षा अवधीत वेगवेगळी कपात आहे.

सरासरी चाैकाच्या ठिकाणी ३० सेकंदांपर्यंत कपात करण्यात आली आहे. हा नियम सकाळी साडे नऊ वाजेपासून सायंकाळी साडेचारपर्यंत लागू असेल. तैपेईमध्ये दिवसभर कडक ऊन असते. साेबतच आर्द्रतादेखील असते. जुलै-आॅगस्ट या काळात येथे जास्त उन्हाळा जाणवताे. तापमान ३६ अंशांपर्यंत पोहाेचताे. उन्हाळ्याच्या या दिवसांत दुचाकीचालक, पादचाऱ्यांना उन्हाच्या लाटेपासून बचाव करण्याचा इशारा देण्यात आला आहे. २५ लाख लोकसंख्या असलेल्या या शहरात पूर्वीदेखील हा मुद्दा चर्चेत राहिला. अनेक चाैकांत तर काही पादचाऱ्यांना ७० ते ८० सेकंद एवढी प्रतीक्षा करावी लागली. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी खूप कमी अवधी दिला जातो. कमी वेळ दिल्याने वृद्धांना त्या वेळेत रस्ता ओलांडता येत नाही, अशी पादचाऱ्यांची तक्रार आहे.

तैवानमध्ये उन्हाची काहिली वाढतेय
तैवानमध्ये सामान्यपणे जास्त ऊन पडते. त्याचबरोबर तापमानदेखील वाढत जाते. एकेडेका सिनिका सेंटर फॉर रिसर्च एन्व्हायर्नमेंटल चेंजेसच्या रिसर्चचे एक फेलो म्हणाले, गेल्या वर्षी तैवानमध्ये तापमान दीड अंश सेल्सियस जास्त होते. तैवानमध्ये उन्हाचे दिवस १२० हून १५० पर्यंत पोहोचले होते. २०६० पर्यंत तैवानमधील थंडीचे दिवस पूर्णपणे इतिहासजमा होऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...